आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 07:19 PM2021-08-23T19:19:42+5:302021-08-23T19:21:40+5:30

नांदूरवैद्य : दरवर्षी वर्षभरात येणारे सण, उत्सव अनाथ तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत साजरे करत एक आगळावेगळा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवत असलेल्या राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व उपसरपंच रमेश खांडबहाले व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत यावर्षी देखील त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील अनाथ व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

Rakshabandhan with children of suicidal farmers | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत रक्षाबंधन

राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत रक्षाबंधन सण साजरा करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते. समवेत मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश खांडबहाले, माजी सैनिक विजय कातोरे, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे व इतर पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देदरवर्षी तालुक्यातील अनाथ, गोरगरीब मुलांसोबत सण, उत्सव साजरे

नांदूरवैद्य : दरवर्षी वर्षभरात येणारे सण, उत्सव अनाथ तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत साजरे करत एक आगळावेगळा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवत असलेल्या राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व उपसरपंच रमेश खांडबहाले व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत यावर्षी देखील त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील अनाथ व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

इगतपुरी तालुक्यातील मनसेप्रेणीत राजयोग प्रतिष्ठानने अध्यक्ष आत्माराम मते यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी तालुक्यातील अनाथ, गोरगरीब मुलांसोबत सण, उत्सव साजरे करत या मुलांना शालेय साहित्य, कपडे तसेच विविध प्रकारची मिठाई आदींसह विविध प्रकारच्या भेटवस्तू देत आदर्श निर्माण केला आहे. यावर्षी देखील आधारतीर्थ आश्रमातील अनाथ व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत रक्षाबंधन सण साजरा करत येथील मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त जवान विजय कातोरे यांनी या अनाथ व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत हितगुज करत त्यांना मार्गदर्शन करत आधार दिला. याप्रसंगी डॉ. प्रशांत मुर्तडक, माजी सैनिक विजय कातोरे, जिल्हा उपाध्यक्ष ललित मुळाणे, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, गोविंद ढगळे, ग्रामपंचायत सदस्य व मनविसेचे तालुकाध्यक्ष दीपक कसबे, वैभव दातीर, ईश्वर गवते आदींसह आश्रमातील कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Rakshabandhan with children of suicidal farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.