शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राजीवनगर, इंदिरानगर परिसरात कमी दाबाने पाणी

By admin | Updated: October 25, 2016 01:38 IST

राजीवनगर, इंदिरानगर परिसरात कमी दाबाने पाणी

इंदिरानगर : परिसरात अद्यापही सणासुदीच्या काळात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने चेतनानगर, राजीवनगर आणि इंदिरानगर परिसरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे मानसिक आणि आर्थिक त्रासास सामोरे जावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे घराघरांत महिलावर्गाचे स्वच्छतेचे काम सुरू आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सकाळी आणि सायंकाळी होणारा पाणीपुरवठा कमी वेळात आणि अत्यंत कमी दाबाने होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून चेतनानगर, राजीवनगर, जाखडीनगर, गणेशनगर, महारुद्र कॉलनी, पाटील गार्डन, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनीसह परिसरामध्ये अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सणासुदीच्या काळात महिलावर्गास पाण्यासाठी हातपंपावर चकरा माराव्या लागत आहे. तसेच काही ठिकाणी मनपाच्या वतीने आणि स्वखर्चाने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, राजीवनगर, इंदिरानगर भागात नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी व अर्चना जाधव यांनी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. (वार्ताहर)