राजीवनगरला ऑफिस फोडून पावणेदोन लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 15:42 IST2021-07-04T15:40:44+5:302021-07-04T15:42:34+5:30
ऑफिसचा पाठीमागील पत्रा कापून आत मधील शीट कापलेले आहे, असे कळवल्यावर आव्हाड तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, चोरट्यांनी प्रवेश करून तीन वेगळ्या ड्रॉव्हरपैकी एक ड्रॉव्हर तोडून त्यातील १ लाख ७५ हजार २४४ रुपये रोख आणि ५०० ग्रॅम वजनाचे ३६ तुपाचे डबे सुमारे दहा हजार ६२० रुपये किमतीचे असा एक लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

राजीवनगरला ऑफिस फोडून पावणेदोन लाखांची लूट
नाशिक : राजीवनगर येथील सुमन पेट्रोल पंपापाठीमागील डेअरी पॉवर लिमिटेडच्या ऑफिसचा पाठीमागील पत्रा कापून एक लाख ८५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप आव्हाड (३६, दत्त चौक, गंगापूर रोड) यांचे डेअरी पॉवर लिमिटेड नाशिक जिल्ह्यात २५ डिस्ट्रिब्युटर हब असून त्याचे गोडाऊन आणि ऑफिस राजीवनगर येथे आहे. जिल्ह्यातील सर्व दुकानांची रक्कम गोळा करून गोडाऊनलगत असलेल्या ऑफिसमध्ये व्यवस्थापक अनिल जाधव यांच्याकडे जमा केली जाते. शनिवारी (दि. ३) रोजी रात्री बारा वाजेपर्यंत व्यवस्थापक अनिल जाधव गोडाऊनच्या आवारात होते. गोडाऊनच्या बाजूला असलेल्या ऑफिसचा पाठीमागील पत्रा कापून आत मधील शीट कापलेले आहे, असे कळवल्यावर आव्हाड तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, चोरट्यांनी प्रवेश करून तीन वेगळ्या ड्रॉव्हरपैकी एक ड्रॉव्हर तोडून त्यातील १ लाख ७५ हजार २४४ रुपये रोख आणि ५०० ग्रॅम वजनाचे ३६ तुपाचे डबे सुमारे दहा हजार ६२० रुपये किमतीचे असा एक लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे