शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडच्या उपनगराध्यक्षपदी राजेंद्र अहिरे बिनविरोध

By admin | Updated: December 30, 2016 23:27 IST

कार्यकर्त्यांचा जल्लोष : स्वीकृत सदस्यपदी महेश बोरसे, गंगाभाऊ त्रिभुवन, नाजिम शेख यांची निवड

मनमाड : पालिकेच्या नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांच्यासह नगरसेवकांनी येथील एकात्मता चौकात सामुदायिक शपथविधी घेऊन पदभार स्वीकारला. पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी रिपाइंचे राजेंद्र अहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मनमाड पालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना-रिपाइंच्या युतीला निर्विवाद बहुमत प्राप्त झाले असून, नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांच्या नेतृत्वाखाली २० नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गटनेतेपदी गणेश धात्रक यांची निवड केल्याचे पत्र सादर केले. याप्रमाणेच कॉँग्रेसच्या गटनेतेपदी रवींद्र घोडेस्वार, तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी कैलास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
आज नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपनगराध्यक्षपदासाठी रिपाइंचे राजेंद्र अहिरे यांनी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून प्रमोद पाचोरकर यांनी स्वाक्षरी केली. उपनगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने राजेंद्र अहिरे यांची बिनविरोध निवड झाल्याने घोषित करण्यात आले. यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून महेश बोरसे (शिवसेना), गंगाभाऊ त्रिभुवन (रिपाइं), नाजिम शेख (कॉँग्रेस) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
येथील एकात्मता चौकात सामुदायिक पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास कांदे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजाभाऊ देशमुख, अलताफ खान उपस्थित होते. नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी सर्वांना शपथ
दिली. जिल्हाध्यक्ष सुहास कांदे, माजी आमदार राजेंद्र देशमुख, व्यापारी संघटनेच्या वतीने उद्योजक अजित सुराणा, मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉ. सुनील बागरेचा, विनय गरूड, गंगाभाऊ त्रिभुवन, संदीप देशपांडे मनोगत व्यक्त केले. विविध संघटना व संस्थांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा  सत्कार करण्यात आला.  यावेळी नगरसेवक प्रवीण नाईक, विनय अहेर, दिलीप भाबड, महेंद्र शिरसाठ, लियाकत शेख, डॉ. दौलतराव ठाकरे, संगीता पाटील, सविता गिडगे, राणी मिश्रा, कल्पना खोटरे, डॉ. अर्चना जाधव, सुरेखा मोरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)