शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

पोतडीतल्या गोष्टी निवडणुकीच्या वेळी बाहेर काढू- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 1:18 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या नाशिक दौऱ्यात त्यांनी येत्या निवडणुकांवरही भाष्य केलं आहे.

ठळक मुद्देपोतडीतल्या गोष्टी निवडणुकीच्या वेळी बाहेर काढू, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. जो मंत्री दिसेल त्याला कांदा फेकून मारा, इतका कांदा मारा की मंत्री बेशुद्ध झाला पाहिजे. सरकारनं क्विंटलला 200 रुपये भाव जाहीर केला असला तरी मी समाधानी नाही.

नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या नाशिक दौऱ्यात त्यांनी येत्या निवडणुकांवरही भाष्य केलं आहे. पोतडीतल्या गोष्टी निवडणुकीच्या वेळी बाहेर काढू, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत. जो मंत्री दिसेल त्याला कांदा फेकून मारा, इतका कांदा मारा की मंत्री बेशुद्ध झाला पाहिजे. या लोकांना निवेदनाच्या भाषा कळत नाही. सरकारनं क्विंटलला 200 रुपये भाव जाहीर केला असला तरी मी समाधानी नाही. मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची यासंदर्भात चर्चा करणार आहे. वेळ आल्यावर सविस्तर बोलेनच, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.राज ठाकरे दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंनी बुधवारी (दि. 19) कळवण येथील पदाधिकारी, कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व उद्योजक यांच्यासह बेरोजगार युवा-युवती यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, कांदे रस्त्यावर फेकू नका. त्यात तुमचेच नुकसान होणार आहे. सरकारला काही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही युतीच्या मंत्र्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवण येथे कांदा उत्पादकांशी संवाद साधताना दिला. कांदा लागल्याने जर मंत्री बेशुद्ध पडला तर तोच कांदा फोडा आणि त्याच्या नाकाला लावा, असेही सांगायला राज विसरले नाहीत. दरम्यान, कळवण आणि सटाणा येथे राज यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.मुंबईला येण्याचे आमंत्रणकांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कळवण तालुक्यातील शेतक-यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेऊन कांदा प्रश्नावर लक्ष घालण्याची विनंती केली. राज ठाकरे यांनी कांदा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कळवण तालुक्यातील कांदा उत्पादकांना मुंबई येथे आमंत्रित केले. कांदा प्रश्न नेमका काय आहे, याचीही त्यांनी माहिती जाणून घेतली. कांदा प्रश्नावर प्रगतिशील शेतकरी मधुकर पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, मुरलीधर पगार, राकेश पाटील, पंडित वाघ ,पांडुरंग पगार यांनी चर्चा केली.शेतकरीप्रश्नी आंदोलनशेतकरी साथ देतील तर मनसे रस्त्यावर उतरतील, असे सांगत राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच आंदोलन छेडले जाणार असल्याचेही स्पष्ट केले.पक्षाचे पदाधिकारी आंदोलन करतील त्यात तुम्ही सहभागी होणार का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थितांशी बोलताना केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेonionकांदा