शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

वर्षा सहली सर्रास सुरू; पर्यटन बंदी केवळ कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 2:20 PM

नाशिक : शहासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. जिल्ह्याबाहेर तसेच पर्यटनासाठी जिल्हांतर्गत ...

ठळक मुद्देगंगापूर, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर, भावली भागात लोंढेदुर्घटना अन् कोरोनाचा फैलाव टाळा

नाशिक : शहासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. जिल्ह्याबाहेर तसेच पर्यटनासाठी जिल्हांतर्गत प्रवासालाही बंदी घालण्यात आली आहे; मात्र ही बंदी केवळ कागदावरच आहे की काय? असा प्रश्न त्र्यंबकेश्वर, भावली, गंगापूर भागात रविवारी (दि.५) पहावयास मिळालेल्या चित्रवारून उपस्थित होत आहे. या भागात वीकेण्डला वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी झेपावणारे लोंढे थांबविण्याची मागणी होत आहे.नाशिक शहर व परिसरातील लोक वीकेण्डला पावसाळी सहलींचा आनंद घेण्यासाठी शहराबाहेरील निसर्गरम्य ठिकाणी तसेच धरण परिसरांमध्ये भटकंतीकरिता बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. यामध्ये तरूणाईची संख्या अधिक आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला तरीदेखील पर्यटनाकरिता प्रवासावर निर्बंध कायम आहे. जिल्हांतर्गत तालुक्याच्याठिकाणीसुध्दा पावसाळी पर्यटनासाठी भटकंती सध्या कोरोनाचे संक्रमण सुरू असल्यामुळे नागरिकांनी करू नये, असे आवाहन वारंवार जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे; मात्र तरीदेखील नागरिक सर्व बंदी व नियम झुगारून पावसाळी सहलींचा आनंद लुटण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी भागातील डोंगरररांगा, पहिने-पेगलवाडी परिसरातील ओहोळ, डोंगरांवरून फेसाळणा-या ‘नेकलेस’ धबबध्याच्या ठिकाणी गर्दी करत असल्याने त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून नाकाबंदी करत दंडात्मक कारवाई केली जात आहे. पर्यटकांना पेगलवाडी फाट्यावरून पुढे मार्गस्थ होण्यास रविवारी मज्जाव करण्यात येत होता. तसेच हरसूल पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली काश्यपी धरणच्या परिसरात गस्त सुरू होती. तसेच या भागात नाकाबंदीही करण्यात आली होती. यामुळे या भागात दाखल होणाºया पर्यटकांना माघारी पाठविण्यात येत होते.

‘भावली’चा मार्ग पोलिसांकडून बंदभावली धरणाकडे जाणा-या पिंप्री सदो गावाच्या फाट्यावर महामार्गालगतच इगतपुरी पोलीसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणावरून पर्यटकांना माघारी पाठविले जात होते. तसेच पिंप्रीसदो ते थेट भावली धबधब्यापर्यंत पोलिसांनी गस्तही वीकेण्डला वाढविली होती. कोरोना संक्रमणामुळे या भागातील वर्षा सहल पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी इगतपुरी तालुक्यात कोठेही पर्यटनासाठी येऊ नये, असे आवाहन इगतपुरी पोलीसांनी केले आहे.दुर्घटना अन् कोरोनाचा फैलाव टाळाशहरासह जिल्ह्यात यावर्षी कोरोनाचे संक्रमण तेजीत असल्यामुळे नागरिकांनी पर्यटनासाठी घराबाहेर पडू नये तसेच पावसाळ्यात धरण परिसर, धबधबे व डोंगररांगा, घाटमाथ्याच्या परिसरात भटकंती टाळावी जेणेकरून दुर्घटनांना निमंत्रण मिळणार नाही. तीन दिवसांपुर्वीच वासाळी शिवारातील एका पाझर तलावात बुडून अंबडमधील दोघा मित्रांचा मृत्यू झाला होता.कोरोनामुळे जिल्ह्यात कोठेही पर्यटनासाठी जाण्यास परवानगी नाही. यामुळे नागरिकांनी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धरण, धबधब्यांच्या परिसरात निसर्गरम्य ठिाकाणी जाणे टाळावे. संबंधित पोलीस ठाणेप्रमुखांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.- डॉ. आरती सिंह, पोलीस अधिक्षक, नाशिक जिल्हा 

टॅग्स :tourismपर्यटनtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरdam tourismधरण पर्यटनRainपाऊसNashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस