नाशिक : शहासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. जिल्ह्याबाहेर तसेच पर्यटनासाठी जिल्हांतर्गत प्रवासालाही बंदी घालण्यात आली आहे; मात्र ही बंदी केवळ कागदावरच आहे की काय? असा प्रश्न त्र्यंबकेश्वर, भावली, गंगापूर भागात रविवारी (दि.५) पहावयास मिळालेल्या चित्रवारून उपस्थित होत आहे. या भागात वीकेण्डला वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी झेपावणारे लोंढे थांबविण्याची मागणी होत आहे.नाशिक शहर व परिसरातील लोक वीकेण्डला पावसाळी सहलींचा आनंद घेण्यासाठी शहराबाहेरील निसर्गरम्य ठिकाणी तसेच धरण परिसरांमध्ये भटकंतीकरिता बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. यामध्ये तरूणाईची संख्या अधिक आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला तरीदेखील पर्यटनाकरिता प्रवासावर निर्बंध कायम आहे. जिल्हांतर्गत तालुक्याच्याठिकाणीसुध्दा पावसाळी पर्यटनासाठी भटकंती सध्या कोरोनाचे संक्रमण सुरू असल्यामुळे नागरिकांनी करू नये, असे आवाहन वारंवार जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे; मात्र तरीदेखील नागरिक सर्व बंदी व नियम झुगारून पावसाळी सहलींचा आनंद लुटण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी भागातील डोंगरररांगा, पहिने-पेगलवाडी परिसरातील ओहोळ, डोंगरांवरून फेसाळणा-या ‘नेकलेस’ धबबध्याच्या ठिकाणी गर्दी करत असल्याने त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून नाकाबंदी करत दंडात्मक कारवाई केली जात आहे. पर्यटकांना पेगलवाडी फाट्यावरून पुढे मार्गस्थ होण्यास रविवारी मज्जाव करण्यात येत होता. तसेच हरसूल पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली काश्यपी धरणच्या परिसरात गस्त सुरू होती. तसेच या भागात नाकाबंदीही करण्यात आली होती. यामुळे या भागात दाखल होणाºया पर्यटकांना माघारी पाठविण्यात येत होते.
वर्षा सहली सर्रास सुरू; पर्यटन बंदी केवळ कागदावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 14:27 IST
नाशिक : शहासह जिल्ह्यातदेखील कोरोनाचे संक्रमण फैलावत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवली आहे. जिल्ह्याबाहेर तसेच पर्यटनासाठी जिल्हांतर्गत ...
वर्षा सहली सर्रास सुरू; पर्यटन बंदी केवळ कागदावरच!
ठळक मुद्देगंगापूर, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर, भावली भागात लोंढेदुर्घटना अन् कोरोनाचा फैलाव टाळा