नाशिक शहर परिसरात पावसाचे पुनरागामन ; रिमझीम सरींनी वातावरणात गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 15:57 IST2020-06-26T15:54:49+5:302020-06-26T15:57:44+5:30
नाशिक शहर परिसरात गेल्या १० ते १२ दिवस ओढ दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२६) पावसाचे पुनरागमन झाले असून दुपारनंतर शहरातील वातावरणात रिमझिम पावसाच्या सरींनी गारवा पसरल्याचे अनुभवायला मिळाले.

नाशिक शहर परिसरात पावसाचे पुनरागामन ; रिमझीम सरींनी वातावरणात गारवा
नाशिक : शहर परिसरात गेल्या १० ते १२ दिवस ओढ दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२६) पावसाचे पुनरागमन झाले असून दुपारनंतर शहरातील वातावरणात रिमझिम पावसाच्या सरींनी गारवा पसरल्याचे अनुभवायला मिळाले. तर उपनगर परिसरात जोरदार सरींमुळे रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले.
नाशिक शहरात गेल्या आठवड्यापूर्वी सलत तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने शहराती विविध भागात पाणी साचले होते. मेनरोड, दहीपूल परिसरातील दुकानांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने व्यावसायिकांची तारंबळ उडाली होती. परंतु त्यानंतर सलग दहा ते बारा दिवसाांसून पावसाने ओढ दिल्यामुळे परिसरातील शेतकºयांना पुन्हा पावसाची प्रतिक्षा लागली होती. शहरात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे गेल्या पंधरवाड्यात अनेक शेतकºयांना पेरण्या केल्या होत्या. मात्र त्यानंतर १० ते १२ दिवस पावसाने ओढ दिली त्यामुळे पीक कोमेजून जाण्याची चिंता शेतकºयांना लागलेली असतानाच शुक्रवारी (दि.२६) शहरात पुन्हा पावसाच्या सरींमागून सरी आल्याने शहरवासियांसह परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. दरम्यान, उपनरगर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने या भागातील रस्ते जलमय होऊन काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले.