नाशिकरोड, भद्रकालीतील जुगार अड्ड्यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:43 IST2018-09-04T18:42:38+5:302018-09-04T18:43:29+5:30

नाशिक : शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी लक्ष्य केले असून, भद्रकाली व नाशिकरोड परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापे टाकून सात संशयितांना ताब्यात घेतले आहे़ या जुगाऱ्यांकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे़

 Raids on gambling bases of Nashik Road, Bhadrakali | नाशिकरोड, भद्रकालीतील जुगार अड्ड्यांवर छापे

नाशिकरोड, भद्रकालीतील जुगार अड्ड्यांवर छापे

ठळक मुद्देजुगार अड्ड्यांवर छापे ; सात संशयित ताब्यातजुगाराचे साहित्य व रोख रक्कमही जप्त

नाशिक : शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी लक्ष्य केले असून, भद्रकाली व नाशिकरोड परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापे टाकून सात संशयितांना ताब्यात घेतले आहे़ या जुगाऱ्यांकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे़

भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़३) सायंकाळी सव्वा वाजेच्या सुमारास बुधवार पेठेतील पोस्ट आॅफिसजवळ असलेल्या देशपांडे गल्लीतील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी संशयित मयूर दिवटे (रा़ बुधवार पेठ), विकास नाईकवाडे (रा. बुधवार पेठ), राजेश जाधव (रा. बुधवार पेठ), अमोल मानकर (रा़ बुधवार पेठ, जुने नाशिक) व भारत डांगरे (रा़ जुने नाशिक) हे पत्त्यांवर अंदरबाहर नावाचा जुगार खेळत होते़ या संशयितांकडून तीन हजार ४३० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

शिंदे गाव ग्रामपंचायतीच्या जवळील पाण्याच्या टाकीखाली जुगार खेळणाºया दोघांना नाशिकरोड पोलिसांनी सोमवारी (दि. ३) ताब्यात घेतले. संशयित किरण कळसकर व गणेश वाघ (रा़ शिंदे गाव) हे टाइम नावाचा जुगार खेळत होते़ या दोघांवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई निखिल वाघचौरे यांच्या फिर्यादीनुसार जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Raids on gambling bases of Nashik Road, Bhadrakali