शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे बॅँकांसमोर रांगाच रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 11:40 PM

तीन दिवस बॅँकांना असलेली सुट्टी आणि त्यात सरकारने जनधन खात्यात जमा केलेले पाचशे रुपये घेण्यासाठी गुरुवारी (दि.९) सकाळपासून येथील बँक आॅफ बडोदा व महाराष्ट्र बँक शाखेबाहेर ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी रस्त्यावर चौकट आखत ग्राहकांना दोन्ही बाजूंनी रांगेत उभे करत नंबरनुसार आत सोडण्यात आले.

ठळक मुद्देओझर : ग्राहकांनी राखले सुरक्षित अंतर

ओझर : तीन दिवस बॅँकांना असलेली सुट्टी आणि त्यात सरकारने जनधन खात्यात जमा केलेले पाचशे रुपये घेण्यासाठी गुरुवारी (दि.९) सकाळपासून येथील बँक आॅफ बडोदा व महाराष्ट्र बँक शाखेबाहेर ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी रस्त्यावर चौकट आखत ग्राहकांना दोन्ही बाजूंनी रांगेत उभे करत नंबरनुसार आत सोडण्यात आले.सुरुवातीच्या काळात ज्या खातेधारकांनी खाते उघडून नंतर व्यवहार नाही केले अशांचे खाते निष्क्रिय झाल्याने प्रत्येकाने आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत घेत त्वरित खाते पुनरुज्जीवित करत पैसे काढताना दिसले. दिवसभरात जवळपास साडेतीनशे ग्राहकांनी पैसे काढत आपले घर गाठले. बँकेचे कर्मचारी प्रवेशद्वारावर उभे राहून प्रत्येक ग्राहकाच्या हातावर सॅनिटायझर देऊन तोंडाला मास्क बांधला आहे की नाही याची खातरजमा करत होते, तर रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना पाण्याची सोय करून देण्यात आली. बँकेतदेखील डाव्या बाजूस महा ई-सेवा केंद्राचे दोन प्रतिनिधी बसविण्यात आले होते.

तीन महिने जनधन खात्यात पाचशे रु पये जमा होईल असे सांगण्यात आले आहे. जमा झालेले पैसे खात्यातून काढले नाही तर ते परत जातील अशी अफवा ग्राहकांमध्ये पसरली असून ती साफ खोटी आहे. ते पैसे ग्राहकांच्याच खात्यात राहणार असून त्यामुळे उगाच बँकेबाहेर गर्दी करण्याचे टाळावे. गरज असेल तेव्हाच बँकेत या. ग्राहकांचे पैसे खात्यात सुरक्षित आहे. गर्दी करून कायद्याचे उल्लंघन करू नका.- प्रवीण बावके, व्यवस्थापक, बँक आॅफ बडोदा, ओझर शाखा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbankबँक