शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा संघटना एकत्र येत असल्याने प्रश्न सुटतील

By admin | Updated: September 3, 2016 23:18 IST

महाडिक : मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

 सिन्नर : पुणे येथे राज्यातील ३२ मराठा संघटनांची एकत्र बैठक झाली. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा संघटनांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. राज्यातील मराठा संघटना एकत्र येत असल्याने मराठा समाजाविषयी विविध प्रश्न सुटतील, असा आशावाद मराठा आरक्षण समन्वय समितीचे संस्थापक विजयसिंह महाडिक यांनी व्यक्त केला. सिन्नर येथे मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी महाडिक बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात दोन वर्षात मराठा संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली नव्हती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यात प्रमुख भूमिका बजावून मुख्यमंत्र्यांसोबत या संघटनांची बैठक घडवून आणल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांसोबत विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, मुंबई येथे छत्रपती शिवरायांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करावे, मराठाभूषण आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजासाठी समिती करून त्यासाठी पाचशे कोटींची तरतूद करावी आदिंसह विविध मागण्यांची फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. यावेळी मराठा पंचायतीचे अनिल साळुंखे, अ‍ॅड. तात्यासाहेब घुमरे, राजेंद्र गडकर, शंकर वारुंगसे, ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष रमेश आमले, अनिल वारुंगसे, विजय पगार, रवींद्र पाटील, भगवान पथवे, रवींद्र सदगीर, सुदाम वारुंगसे, धनंजय शिंदे, मंगेश क्षीरसागर, भूषण दुबे, अमर सांगळे, धनंजय वारुंगसे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)