शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

गस्त पथकासाठी ‘क्यूआर कोड’ स्कॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:05 IST

इंदिरानगर : शहरामध्ये वाढणाºया गुन्हेगारीला आळा बसावा, पोलीस गस्तविषयी लोकांमध्ये विश्वासार्हता आणि कर्मचाºयांमध्ये गांभीर्य वाढावे, यासाठी पोलीस आयुक्तालयाने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘ब्लॅक स्पॉट’वर क्यूआर कोड बसविला असून, हा कोड गस्तीदरम्यान, कर्मचाºयाला तेथे जाऊन मोबाइलने स्कॅन करावा लागणार आहे.

इंदिरानगर : शहरामध्ये वाढणाºया गुन्हेगारीला आळा बसावा, पोलीस गस्तविषयी लोकांमध्ये विश्वासार्हता आणि कर्मचाºयांमध्ये गांभीर्य वाढावे, यासाठी पोलीस आयुक्तालयाने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘ब्लॅक स्पॉट’वर क्यूआर कोड बसविला असून, हा कोड गस्तीदरम्यान, कर्मचाºयाला तेथे जाऊन मोबाइलने स्कॅन करावा लागणार आहे.‘क्यूआर कोड’मुळे पोलीस कर्मचाºयांकडून गस्त गंभीरपणे व प्रामाणिकपणे घालण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचा विश्वास अधिकाºयांना आहे. बीट मार्शल, गस्त पथक वाहनातील कर्मचाºयांना आपल्या मोबाइलद्वारे पोलीस ठाणे हद्दीतील विविध भागांमध्ये बसविलेला क्यूआर कोड गस्तीदरम्यान स्कॅन करणे बंधनकारक राहणार आहे. या कोडच्या स्कॅनिंगनंतर संबंधित पोलीस त्या भागात पोहचला व कोणत्या वेळेस त्याने क्यूआर कोड स्कॅन केला याची माहिती आयुक्तालयाला मिळण्यास मदत होणार आहे. हा आगळावेगळा प्रयत्न आयुक्तालयामार्फत इंदिरानगर परिसरात सुरू करण्यात आला आहे. विविध परिसरातील अपार्टमेंट, चौकांमध्ये क्यूआर कोड बसविण्यास सुरुवात झाली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याची हद्द नासर्डी ते विल्होळी जकात नाका आणि राजीवनगर, चेतनानगर, राणेनगर यासह वडाळागाव परिसरापर्यंत आहे. भौगोलिक दृष्ट्या ही हद्द मोठी असून, कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्यामुळे गुन्हेगारीही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच काही कर्मचाºयांकडून संपूर्ण परिसरात गस्त घालण्याबाबत काणाडोळा केला जातो. यामुळे आयुक्तालयाकडून ‘क्यूआर कोड’चा नवा प्रयोग करण्यात येत आहे. हा प्रयोग सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबविला जाणार आहे.