शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांचा आठ फुटी टाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST

नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने छत्रपती सेनेच्यावतीने यंदा विक्रम प्रस्थापित करण्याची तयारी केली जात आहे. यंदा शिवाजी ...

नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने छत्रपती सेनेच्यावतीने यंदा विक्रम प्रस्थापित करण्याची तयारी केली जात आहे. यंदा शिवाजी महराज यांची प्रतिकृती असलेला आठ फुटी टाक तयार केला जाणार आहे. तांबे आणि पितळ या धातूपासून टाक तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सालाबादाप्रमाणे यंदा ही छत्रपती सेना आपले वेगळेपण जपत विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहे.

यंदाच्या जयंती उत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ८ फूट उंच व ६ फूट रुंद व अंदाजे ७० किलो वजनाचा टाक तयार केला जाणार आहे, हा टाक नाशिकचे कारागीर शुभरूषी ज्वेलर्सचे कारागीर विश्वनाथ संगमनेरे व बंधू घडवित आहेत. टाक पूर्णत्वास येण्यासाठी किमान ३० दिवसाचा कालावधी लागणार आहे. या टाकाचा आनावरण सोहळा १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या दरम्यान सदर टाकाची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शिवजयंती निमित्ताने शिवकालीन मैदानी खेळ व शौर्य प्रदर्शन होणार आहे असून लाठ्याकाठ्या तलावर ,दांडपट्टा, चक्र असे विविध खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहेत. इतिहासकालीन नाण्याचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच शिवजागर गोंधळ व शिवकालीन पोवाड्यांचा कार्यक्रम देखील होणार आहे. यामध्ये महाराजांचा गुप्तहेर विभाग कसे काम करीत होता याची माहिती मांडली जाणार आहे. नाशिक जिल्हा छायाचित्रकार असोसिएशन व महाराष्ट्रातील हौशी छायाचित्रकारांसाठी उत्कृष्ट शिवछायाचित्रकार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी ( २०२०) सकारलेले विश्वविक्रमी भवानी तलवार मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वस्तू संग्रहालयाला भेट स्वरूपात दिली जाणार आहे.

टाक घडविण्यासाठी छत्रपती सेनेतर्फे संस्थापक चेतन शेलार, कार्याध्यक्ष नीलेश शेलार, कोर टीम तुषार गवळी, उपाध्यक्ष राजेश पवार , संदीप निगळ, सुनील देशमुख. सागर पवार. सागर आहेर. डॉ श्याम थविल , उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जयेंद्र थविल, जिल्हा प्रमुख राहुल पाटील धीरज खोळंबे , संपर्क प्रमुख विशाल पाटील, राज्य संघटक श्रीकांत इशे , छत्रपती सेना वकील आघाडीप्रमुख राजाभाऊ ठाकरे, विद्यार्थी आघाडी प्रमुख ऋषिकेश गरुड ,महानगर प्रमुख अविनाश पाटील सुहास गडाख, सुदर्शन निमसे, राज गुंजाळ, सागर जाधव, सागर विशे. छत्रपती सेना महिला आघाडी पूजा खरे, ऋतुजा काकडे. धनश्री वाघ. जिल्हा संघटक किशोर तिडके मुस्लिम आघाडी प्रमुख अस्लम लालू, प्रसाद पवारसह छत्रपती सेनेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

(फोटो: डेस्कॅन)