शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

हा तर संस्कृती रक्षकांचा शुद्धिकरण महायज्ञ

By admin | Updated: August 23, 2016 00:15 IST

हा तर संस्कृती रक्षकांचा शुद्धिकरण महायज्ञ

!हेमंत कुलकर्णी ल्ल नाशिकपुरेसे ज्ञान नाही. साधी माहितीही नाही. हिन्दुस्तानातील संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी अवतारित झालेल्या संघाच्या मुशीतून घडलेल्या (मोहन भागवत भले काहीही म्हणोत) भाजपाची ध्येयधोरणे ठाऊक नाहीत, मुळात हिन्दू संस्कृती कशाशी खातात याचे भान नाही. त्यामुळे या संस्कृतीची व्यवच्छेदक लक्षणे कोणती याचा अभ्यास नाही. आणि चालले मोठे भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायला! काय तर म्हणे भाजपाने सोवळे सोडून ठेवले पण ओवळे सापडत नाही. किती ही हीन पातळीवर जाऊन केलेली टीका!ज्यास थारा नाही, निवारा नाही, कोणाचा आश्रय-सहारा नाही त्याला उराशी कवटाळणे ही तर खरी हिन्दू संस्कृती! एखादा वृक्ष किंवा साधे झाड जरी पडले तरी त्या झाडावर वस्ती करुन असलेली आणि त्या झाडाच्याच आधारे आपली क्षुधाशांती आणि तृष्णाशांती करणारी पाखरे सैरभैर होतात. सैरावैरा सहारा शोधत फिरु लागतात. येथे तर साधे एकादे झाड किंवा वृक्ष नव्हे तर अवघा ‘फार्म’च उन्मळून पडला आहे. त्या फार्मच्या जोरावर आणि भरवशावर जे त्या गजाननागत तुंदीलतनू झाले त्यांच्या उदरभरणाची सोय करणे ही तर साधी भूतदया. ती दाखविली तर कोण तो गहजब. त्यातून ज्यांचेवर ती सहानुभूती दाखवायची ते का कायमचे वस्तीला येऊन राहाणार आहेत? आज भाजपाचे झाड कैऱ्यांनी वा चिंचेनी लदलदले आहे. उद्या त्यांचीदेखील फार्मसारखी बाभळ झाली तर कोण येणार आहे अंगाला काटे टोचवून घ्यायला?प्रभू रामचन्द्राच्या भव्य मंदिरासाठी प्राणार्पण करण्यासाठी सदैव दक्ष राहाणाऱ्यांचा हा पक्ष रामाइतकाच रामदूत हनुमंताचादेखील परमभक्त. याच हनुमंताला पवनसूत म्हणजे पवनाचा म्हणजे वाऱ्याचा पुत्र म्हणूनही सारे जग ओळखते. मग ज्या पवनपुत्राच्या ठायी सारी भक्ती एकवटते त्याच्या पित्याचे नाव धारण करणाऱ्यास चार विरोधी टाळकी विरोध करतात वा विरोध करतील म्हणून का भाजपानेही असेच वाऱ्यावर सोडून द्यायचे असते? तसे करणे म्हणजे पापाचरण. शरण आलेल्याला मरण द्यायचे नसते, त्याला शरण देऊन पोटाशी घ्यायचे असते हे साधे संस्कृतीरक्षक तत्त्व ज्यांना मान्य नाही त्यांची टीका मग भाजपाने तरी का मान्य करावी? पवन म्हणजे झंझावात. हा झंझावात जेव्हां ज्याची योग्यता दहा पाच हजारांचे नायकत्व पत्करण्याचीही नसते त्याला थेट पाच-सहा लक्ष लोकांचे नायकत्व मिळवून देतो तेव्हां त्याने केलेल्या या थोर उपकाराचे स्मरण ठेवून त्याच्या भाळी केशरी टिळा लावणे यात कोणते आले आहे पाप? शेवटी भाजपाची संस्कृती सांगते तेच खरे. पाप नेहमी बघणाऱ्याच्या नजरेत असते!भाजपाची हिन्दु संस्कृती म्हणजे वीरस्मरण करण्याची. वीरांचा यथोचित गौरव करण्याची. त्यांना त्यांचे उचित स्थान मिळवून देण्याची. वर्दीतल्या सरकारी मुलाजिमाला साधे मारणे तर सोडाच पण जीवे मारणे हे का कोणा येरागबाळ्याचे काम? तेथे शौर्य हवे, धाडस हवे, बळ हवे, अंगी विरश्री हवी, आणि निधडी छाती हवी. जो महापुरुष या पंचगुणांचा स्वामी आहे त्याच्या गुणांचा यथोचित आदर करणे याला लागणारी गुणग्राहकता हे तर भाजपाच्या संस्कृतीचे महत्वाचे व्यवच्छेदक लक्षण.इतके दिवस वयं पंचाधिकं शतं हे तत्त्व पाळले गेले. हिन्दु संस्कृतीच्या रक्षणाचे आणि मराठी मनाच्या पोषणाचे काम त्या शतमवाल्यांकडे सुपूर्द करुन ठेवले होते. त्यात एक सोयदेखील होती. पण आता वयं पंचाधिकं शतं नव्हे तर शत प्रतिशत अहं! काम सोपे नाही, पण अशक्यदेखील नाही. अशक्य ते शक्य करुन दाखवायचे तर दारी आलेल्या याचकाला त्याचा धर्म, त्याचे कर्म आणि त्याचे मर्म विचारायचे नसते. त्याला सरळ पोटाशी घ्यायचे असते. कारण हे कार्य साधेसुधे नाही. तो एक संस्कृतीरक्षणाचा आणि शुद्धिकरणाचा महायज्ञ आहे. मागे कोण कायसे म्हणत होते की, आम्ही अंगा-खांद्यावर समाजातील साप-विंचू-नाग (ज्यांच्यासाठी अलीकडे समाजकंटक असा अत्यंत अभद्र शब्दप्रयोग वापरला जातो) बाळगतो आणि सोयीनुसार त्यांच्या सेवादेखील घेतो, हा राजकीय पक्षांच्या दृष्टीने मोठा अभिमानाचा विषय असतो. याला भाजपाने अपवाद ठरावे, असे तर टीकाकारांना म्हणायचे नाही? खुशाल म्हणोत, पण आता कोण त्यांची पर्वा करतो? पण या टीकाकारांनी एक बाब नीट समजून घेणे अंती त्यांच्याच हिताचे. भाजपावाले भले असतील नावापुरते का होईना साव, पण त्यांनी जे साप-नाग-विंचू अंगावर धारण केले आहेत ते केवळ हौस म्हणून किंवा नागपंचमीचा खेळ करता यावा म्हणून नव्हे!