शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

श्रीगणेशाची हेल्मेटबाबत जनजागृती़...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:34 AM

दुचाकी चालविताना ‘हेल्मेट’ आणि चारचाकी चालविताना ‘सीटबेल्ट’ किती महत्त्वाचे आहे, याबाबत नाशिकमध्ये खुद्द गणपती बाप्पाच जनजागृती करीत असून, पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा, गणशोत्सव मंडळ व सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून हा अनोखा उपक्रम गंगापूर नाका सिग्नलवर मंगळवारी (दि़ १८) राबविण्यात आला़

ठळक मुद्देगंगापूर नाका : जनजागृतीसाठी पोलीस आयुक्तांसह अधिकारी रस्त्यावर

नाशिक : दुचाकी चालविताना ‘हेल्मेट’ आणि चारचाकी चालविताना ‘सीटबेल्ट’ किती महत्त्वाचे आहे, याबाबत नाशिकमध्ये खुद्द गणपती बाप्पाच जनजागृती करीत असून, पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा, गणशोत्सव मंडळ व सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून हा अनोखा उपक्रम गंगापूर नाका सिग्नलवर मंगळवारी (दि़ १८) राबविण्यात आला़घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी बाप्पा विराजमान झाले आहेत़ शहरात बहुतांशी दुचाकी व चारचाकीचालक हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करीत नाहीत तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असून, अपघातात आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत़ त्यामुळे खुद्द गणपती बाप्पांनीच गंगापूररोड सिग्नलवर वाहनचालकांना हेल्मेट, सीटबेल्ट व वाहतूक नियमांचे धडे दिले़यावेळी नागरिकांनी गणेशाची वेशभूषा केलेल्यांची वाहतूक नियमांवर रचलेली आरती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे, महेश देवीकर, फुलदास भोये, नाशिकचा राजा मंडळाचे समीर शेटे यांनी म्हटली़ तर एका महिलेने हेल्मेटमुळे पतीचे प्राण वाचल्याचे सांगून दुचाकीवर हेल्मेट घालण्याचे आवाहन केले़ पोलिसांनी केलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे़एक आगळावेगळा उपक्रमनाशिकच्या रस्त्यावर श्रीगणेशाच्या वेशातील चौघे ढोल पथकाच्या साथीने रस्त्यावर फिरत लोकांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देत होते. श्री गणेशाची वेशभूषा केलेल्यांच्या हातामध्ये ‘भक्ता, दुचाकीवर हेल्मेट नक्की वापर, कारण प्रत्येकालाच माझ्यासारखं डोकं बदलून मिळेलच असे नाही’ हे फलक होते़ अनेकजण वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवितात. लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि त्यांचा अवलंब करावा यासाठी नाशिक पोलिसांनी एक आगळावेगळा उपक्रम राबविला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयTrafficवाहतूक कोंडी