शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

जिल्ह्यातील ५२ पशुवैद्यकीय दवाखान्यांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:33 IST

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची गेल्या पंधरा वर्षांपासून परवड सुरू असून, अनेक रुग्णालयांना गळती व पडझड झालेली असल्याने पावसाळ्यात तेथे बसून काम कसे करावे, असा प्रश्न पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. या दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सेसमधून निधीची तरतूद करण्यासाठी सभापती नयना गावित यांनी केलेल्या प्रयत्नांनाही अपयश आल्याने आता शासनाकडून निधी मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

ठळक मुद्देनिधीचा अभाव । गळकी छते, तडे गेलेल्या भिंती

नाशिक : जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची गेल्या पंधरा वर्षांपासून परवड सुरू असून, अनेक रुग्णालयांना गळती व पडझड झालेली असल्याने पावसाळ्यात तेथे बसून काम कसे करावे, असा प्रश्न पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. या दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सेसमधून निधीची तरतूद करण्यासाठी सभापती नयना गावित यांनी केलेल्या प्रयत्नांनाही अपयश आल्याने आता शासनाकडून निधी मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.या संदर्भात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अनेक वेळा तक्रारीही केल्या, परंतु जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याचे कारण देत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात या दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी किमान एक कोटी रुपयांची तरतूद करावी, असा प्रस्ताव सभापती गावित यांनी ठेवला होता, परंतु तो अमान्य करण्यात आला आहे. या दवाखान्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी किमान दोन कोटी रुपयांची गरज आहे. यासंदर्भात वारंवार शासन दरबारीही प्रयत्न करण्यात आले असता, शासनाने मालेगाव तालुक्यातील फक्त चार दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी चार ते पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे. जिल्ह्यातील ५२ दवाखाने अखेरच्या घटका मोजत असताना शासनाने केलेली मदत अतिशय तुटपुंजी असल्याने येत्या पावसाळ्यात या दवाखान्यांमध्ये अधिकाºयांनी कामे कशी करावीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते अशा वेळी पशुवैद्यकीय अधिकाºयांना दवाखान्यातच थांबावे लागत असल्यामुळे गळक्या दवाखान्यांची डागडुजी करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी येत्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा पशुसंवर्धन सभापती नयना गावित यांनी राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची भेट घेणार आहेत.उभारणीनंतर दुरुस्ती झालीच नाहीजिल्ह्णात जिल्हा परिषदेचे २५२ पशुवैद्यकीय दवाखाने असून, त्यातील ५२ दवाखान्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. जेव्हापासून हे दवाखाने उभारले तेव्हापासून त्यांची देखभाल व दुरुस्ती झालेली नाही, त्यामुळे यातील काही दवाखाने पडण्याच्या अवस्थेत आले आहेत, तर काहींचे छत गळू लागले असून, भिंतींना तडे जाऊन दरवाजे, खिडक्याही जीर्ण झाल्या आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदhospitalहॉस्पिटल