शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

डास नियंत्रणासाठी महापालिकेचा समिती स्थापनेचा प्रस्ताव

By admin | Updated: October 22, 2016 01:51 IST

नियोजन : २० दिवसांत डेंग्यूचे ७५ रुग्ण

नाशिक : गेल्या तीन-चार वर्षांपासून डेंग्यूने शहराला पछाडल्याने हैराण झालेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी बृहन्मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येही डास नियंत्रण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, समितीमार्फत वर्षभर उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. दरम्यान, शहरात वातावरणात बदल होऊनही गेल्या २० दिवसांत शहरात डेंग्यूचे २८२ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून, त्यापैकी ७५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले आहे.शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भरच पडते आहे. महापालिकेच्या वतीने डेंग्यूच्या डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष कृती अभियान राबवूनही अद्यापपावेतो एडीस जातीच्या डासांच्या अळ्या सापडत आहेत. नागरिकांच्या प्रबोधनावर भर देऊनही डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग हतबल झाला आहे. महापालिकेने आता यापुढे डेंग्यूसह मलेरिया व डासांपासून उद्भवणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे बृहन्मुंबईच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतही डास नियंत्रण समितीची स्थापना केली जाणार असून, आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत डास  उत्पत्तीशी निगडित असलेला बांधकाम विभाग, भुयारी गटार, पाणीपुरवठा, नगररचना, स्वच्छता, मलेरिया,  शिक्षण तसेच क्रेडाई, निमा-आयमा, आयएमए यांच्या प्रतिनिधींचा सदस्य म्हणून समावेश असणार आहे. सदस्य सचिव म्हणून आरोग्याधिकाऱ्यांची नियुक्ती  होईल. सदर समितीच्या वर्षातून तीनदा सभा होतील. या सभांच्या माध्यमातून त्या-त्या परिस्थितीनुसार डास निर्मूलनासाठी कृती कार्यक्रमाची आखणी करून उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)