शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

जिल्ह्यात २२० नवीन  मतदान केंद्रांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 1:50 AM

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेबाबत केलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यात २२० नवीन मतदान केंद्रांची भर पडली असून, त्यांच्या मान्यतेचे प्रस्ताव राज्यपातळीवरून केंद्रीय पातळीवर पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्णातील मतदान केंद्रांची संख्या आता ४,४४८ इतकी झाली आहे.

नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेबाबत केलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यात २२० नवीन मतदान केंद्रांची भर पडली असून, त्यांच्या मान्यतेचे प्रस्ताव राज्यपातळीवरून केंद्रीय पातळीवर पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्णातील मतदान केंद्रांची संख्या आता ४,४४८ इतकी झाली आहे.  पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने आत्तापासूनच मतदारयाद्यांचे अद्यावतीकरण करण्याबरोबरच मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्याच्याही सूचना केलेल्या आहेत. साधारणत: ग्रामीण भागात एका मतदान केंद्रावर १२०० मतदारांच्या मतदानाची सोय तर शहरी भागात हीच संख्या १४०० इतकी असून, त्यापेक्षा अधिक मतदार असतील तर त्यासाठी नवीन मतदान केंद्र तयार करण्यास आयोगाने अनुमती दिलेली आहे. ज्या मतदान केंद्रांवर कमी मतदार असतील त्या केंद्रावर मतदारांची संख्या वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे.  मतदाराला त्याच्या घरापासून दोन किलो मीटरच्या आत मतदान केंद्र असावे, असा दंडक घालून देण्यात आल्याने जिल्ह्णात यापूर्वी ४,२२८ इतकी मतदान केंद्रे होती.  त्यात बहुतांशी मतदान केंद्रे जुन्या मतदान केंद्राच्या आवारातच असून, काही ठिकाणी मात्र नजीकच्या शाळांमध्ये नवीन मतदान केंद्राचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा निवडणूक शाखेने या मतदान केंद्रांचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला असून, तेथून मान्य होऊन तो अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे रवाना करण्यात आला आहे.वाढलेले मतदान केंद्रे (कंसात एकूण)* नांदगाव-१० (३२६)* मालेगाव मध्य-५ (२२३)* मालेगाव बाह्ण-९ (३०८)* बागलाण-१७ (२८०)* कळवण-१५ (३३८)* चांदवड-३३ (२९४)* येवलाा-२४ (३१२)* सिन्नर-३० (३१८)* निफाड-८ (२७१)* दिंडोरी-१९ (३११)* नाशिक पूर्व-४ (२९५)* नाशिक मध्य-६ (२९४)* नाशिक पश्चिम-१२ (३३९)* देवळाली-८ (२४७)* इगतपुरी-२० (२८८)

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक