शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील व्यक्तिगत कायद्यांचा प्रगतीत अडथळा : न्यायमूर्ती कर्णिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:10 IST

नाशिक : देशात सर्व मानवी व्यवहारांच्या बाबतीत समान कायदे आहेत. परंतु विवाह, घटस्फोट यासंबंधी मात्र अद्याप एकही कायदा लागू केलेला नाही. त्यासंबंधीचे व्यक्तिगत कायदे हे सर्व धर्मांसाठी वेगवेगळे असून त्या संबंधित रुढींवर, धर्मग्रंथांवर आधारलेल्या व परंपरेने चालत आलेल्या पद्धतींवर आधारित असले तरी अशा प्रकारचे कायदे देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणारे व सामाजिक न्यायाला बाधा निर्माण करणारे आहेत़ तसेच समान नागरी कायदा हा अत्यंत वादग्रस्त, संवेदनशील व भावनात्मक प्रश्न असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी शनिवारी (दि़१३) केले.

ठळक मुद्दे संदीप विद्यापीठ : समान नागरी कायदा व्याख्यान

नाशिक : देशात सर्व मानवी व्यवहारांच्या बाबतीत समान कायदे आहेत. परंतु विवाह, घटस्फोट यासंबंधी मात्र अद्याप एकही कायदा लागू केलेला नाही. त्यासंबंधीचे व्यक्तिगत कायदे हे सर्व धर्मांसाठी वेगवेगळे असून त्या संबंधित रुढींवर, धर्मग्रंथांवर आधारलेल्या व परंपरेने चालत आलेल्या पद्धतींवर आधारित असले तरी अशा प्रकारचे कायदे देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणारे व सामाजिक न्यायाला बाधा निर्माण करणारे आहेत़ तसेच समान नागरी कायदा हा अत्यंत वादग्रस्त, संवेदनशील व भावनात्मक प्रश्न असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी शनिवारी (दि़१३) केले. संदीप विद्यापीठातील ‘स्कूल आॅफ लॉ’तर्फे आयोजित समान नागरी कायदा या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते़

कर्णिक पुढे म्हणाले की, धर्माला अनुसरून तयार करण्यात आलेल्या देशातील व्यक्तिगत कायद्यांवर धर्माचा जबरदस्त पगडा बसलेला आहे़ व्यक्तिगत कायदे आणि धर्माचा फारसा संबंध नसतो, असा समज आहे. मात्र, व्यक्तिगत कायदे हे धर्माशी संबंधित असून, त्यामुळे ते अपरिवर्तनीय असल्याचे मत कर्णिक यांनी यावेळी व्यक्त केले. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित सर्व पैलूंचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे़़ सर्वांसाठी समान कायदे असावेत व त्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणेही तितकेच आवश्यक आहे़ तिहेरी तलाकसारख्या अनेक कायद्यांच्या पार्श्वभूमीवर समान नागरी कायदा तयार करून घटनात्मकदृष्ट्या त्याची अंमलबजावणी करणे योग्य असल्याचे मत डांगरे यांनी व्यक्त केले़

पारंपरिक रूढी व परंपरेवर आधारित असलेले कायदे अयोग्य तसेच समानतेला बाधा आणणारे असल्यामुळे अशा व्यक्तिगत कायद्यांऐवजी सर्वांना लागू होणारा समान नागरी कायदा अस्तित्वात आणणे आवश्यक असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील कीर्ती कुलकर्णी यांनी व्यक्त केले़ यावेळी व्यासपीठावर नॅशनल वुमेन्स लॉयर्स फेडरेशनच्या अध्यक्षा प्रीती शहा, राज्यसभेच्या खासदार यामी याज्ञी, अ‍ॅडव्होकेट इंद्रायणी पटणी, उच्च न्यायालयाच्या वकील सीमा सरनाईक तसेच संदीप विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. रामचंद्रन, अधिष्ठाता डॉ़ द्विवेदी स्कूल आॅफ लॉ चे प्रमुख धनाजी जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.धर्मनिरपेक्ष कायद्याची आवश्यकतासमान नागरी कायदा हा धर्मनिरपेक्ष असणे आवश्यक आहे, अन्यथा नागरिकांना देण्यात आलेल्या मूलभूत अधिकारांचा भंग होण्याची शक्यता असते़ म्हणूनच विविध धर्मांच्या व परंपरेच्या आधारांवर असलेले व्यक्तिगत कायद्यांपेक्षा समान कायदा अंमलात आणणे गरजेचे असल्याचे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकcollegeमहाविद्यालय