शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सानिमित्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:09 IST

स्वकुळ साळी समाजाचे आद्य दैवत भगवान जिव्हेश्वरांचा जन्मोत्सव विविध उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वकुळ साळी समाजातर्फे भगवान जिव्हेश्वर यांच्या चांदीच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

येवला : स्वकुळ साळी समाजाचे आद्य दैवत भगवान जिव्हेश्वरांचा जन्मोत्सव विविध उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वकुळ साळी समाजातर्फे भगवान जिव्हेश्वर यांच्या चांदीच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीमध्ये वेशभूषा केलेल्या दोन मुली घोड्यावर स्वार होत्या. रथात भगवान जिव्हेश्वराची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. मिरवणुकीत महिलांनी व समाजबांधवांनी भगवा फेटा व टोपी परिधान केली होती.जय जिव्हेश्वर व हर-हर जिव्हेश्वर अशी मुद्रा असलेली टोपी समाजबांधवांनी परिधान केली होती. मिरवणुकीमध्ये साळी समाजातील आबालवृद्धांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांनी टिपरीनृत्यासह विविध कला सादर केल्या. मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी भावसार समाज अध्यक्ष सुनील भावसार, कोष्टी समाजाचे अध्यक्ष मनोज भागवत, जय बजरंग फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष मंगेश माळोकर, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, जिव्हेश्वर पतसंस्थेच्या चेअरमन चेतन कोळस, व्हा. चेअरमन कुंदन झोंड यांनी पालखीचे पूजन करून स्वकुळ साळी समाजाध्यक्ष दत्तात्रय मुंगीकर व उपाध्यक्ष सुभाष साळवे यांचा सत्कार केला. भगवान जिव्हेश्वरांच्या चांदीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मयूर रोडे व बिद्रविशाल भंडारी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन कैलास येलगट यांनी केले. पौरोहित्य प्रदीप धुमाळ व संदीप धुमाळ यांनी केले. भाऊ भागवत, तुलशीदास अनभुले, घुमरे यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आले. मिरवणुकीमध्ये सहभागी सर्व समाजबांधवांना जिव्हेश्वर पतसंस्थेच्या वतीने दुधवाटप करण्यात आले.