शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहांतील कैद्यांनाही ‘आधार

By admin | Updated: July 29, 2014 00:50 IST

कारागृहांतील कैद्यांनाही ‘आधार

 

’नाशिक : विविध गुन्ह्यांत कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही आता आधार कार्ड देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, सोमवारी त्या संदर्भात तुरुंग महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी नाशिकहून सर्व कारागृहांच्या अधीक्षकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने संपर्क साधून तशा सूचना केल्या व प्रशासनालाही तातडीने प्रत्येक कारागृहात आधार कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. देशातील प्रत्येक नागरिकाची शासनदप्तरी नोंद करून त्याला कायमस्वरूपी एकच ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला व त्यादृष्टीने या प्रकल्पात कोट्यवधी नागरिकांनी सहभागी होऊन आधार कार्ड प्राप्तही केले. परंतु तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैदी व तृतीयपंथीयांबाबतचा तिढा कायम होता. मध्यंतरी तृतीयपंथीयांबाबत शासनाने निर्णय घेऊन त्यांना आधार कार्ड उपलब्ध करून दिले. आता मात्र तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही आधार कार्ड देण्याचे ठरले आहे. त्यासाठी कारागृह व्यवस्थापनाकडे कैद्यांच्या असलेल्या रेकॉर्डच्या आधारेच पुरावे शोधून ही कार्यवाही करण्याचे ठरले असून, कच्च्या कैद्यांच्या पुराव्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्यामार्फत नातेवाइकांशी संपर्क साधून कागदपत्रे मागविण्याचे ठरविण्यात आले आहे. ज्या कैद्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांची बहुतांशी माहिती कारागृह व्यवस्थापनाकडे असल्याने त्याचा उपयोग त्यांच्या ओळखीचा पुरावा देण्यास पुरेशी असल्याचे कारागृह व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी नाशिकहून सोमवारी राज्यातील सर्व कारागृह अधीक्षकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधला व त्यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात येत्या दोन दिवसांत आधार कार्ड काढण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) नीलेश जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)