पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी नाशिकमध्ये भाजपाचा महामृत्युंजय जप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 11:26 IST2022-01-07T11:24:24+5:302022-01-07T11:26:53+5:30
Nashik BJP : आज सकाळी रामकुंड येथे असलेल्या श्री बाणेश्वर मंदिरात भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, शहराध्यक्ष गिरीश पालवे तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा महामृत्युंजय जप करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी नाशिकमध्ये भाजपाचा महामृत्युंजय जप
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या त्रुटीमुळे त्यांच्या जीवावर बेतले असते. त्यामुळे भविष्यात त्यांच्यावर कोणतीही संकट येऊ नये, तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी नाशिकमध्येभाजपाच्यावतीने महामृत्युंजय जप करण्यात आला.
आज सकाळी रामकुंड येथे असलेल्या श्री बाणेश्वर मंदिरात भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, शहराध्यक्ष गिरीश पालवे तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा महामृत्युंजय जप करण्यात आला.
निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी पंजाब येथे जाहीर सभा घेणार होते. त्यासाठी जात असताना शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांना उड्डाण पुलावर अडकून राहावे लागले. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले असले, तरी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट होता, असा आरोप भाजपच्या स्थानिक आमदारांनी केला. तसेच, नरेंद्र मोदींना दीर्घायुष्य लाभावे यासाठी महामृत्युंजय जप करण्यात आला.