शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

प्रधानमंत्री कृषी सिंचनात नाशिक राज्यात प्रथम

By संजय डुंबले | Published: January 15, 2020 1:56 AM

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने (प्रतिथेंब अधिक पीक) अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन साहित्य खरेदीसाठी देण्यात येणाºया अनुदान वाटपात राज्यात नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २६०६ शेतकºयांना ६ कोटी दहा लाख ३९ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना लाभ : साडे सहा कोटींचे अनुदान

नाशिक : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने (प्रतिथेंब अधिक पीक) अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन साहित्य खरेदीसाठी देण्यात येणाºया अनुदान वाटपात राज्यात नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २६०६ शेतकºयांना ६ कोटी दहा लाख ३९ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. ठिबकसाठी १९७५ तर तुषार सिंचन योजनेसाठी ६३१ शेतकरी पात्र ठरले आहेत. नाशिक पाठोपाठ औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्याचा क्रमांकलागतो.पर्जन्यमान लक्षात घेऊन पाण्याची बचत व्हावी त्याचबरोबर उत्पादन वाढून शेतकºयांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य शासन यांच्या संयुक्त अनुदानातून शेतकºयांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविली जाते. यात शेतकºयांना ठिबक आणि तुषार सिंचनाचे साहित्य खरेदी करण्यासाठी शासनामार्फत अल्प भूधारक शेतकºयांना ५५ टक्के तर बहुभूधारक शेतकºयांना ४५ टक्के अनुदान दिले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन पध्दतीने राबविली जाते.यातून १७१५.६९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ठिबकसाठी ५ कोटी २७ लाख ११ हजार रुपये तर तुषारसाठी ८३ लाख २८ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. या योजनेसाठी सध्या ५५ आणि ४५ टक्के अनुदान देण्यात येत असले तरी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत अधिकचे २५ आणि ३० टक्के अनुदान देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याला केवळ प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अद्याप त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्या अनुदानाचा यात समावेश करण्यात आलेला नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत १५ मार्च २०२० पर्यंत आहे. अधिकाधिक शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक संजीवकुमार पडोळ यांनी केले आहे.राज्यातील जिल्हानिहाय अनुदान वाटप झालेली शेतकरी संख्याऔरंगाबाद -२३६३, सोलापूर १९२४, पुणे १५६९, जालना ११७२, बुलडाणा ७९६, यवतमाळ ७०९, अहमदनगर ६८३, हिंगोली ६१७, नांदेड ४६५, धुळे ४५०, सातारा ४२३, वाशिम ४४३, नागपूर ३२४, परभणी ३०८, वर्धा २८६, चंद्रपूर१७६, उस्मानाबाद १४०, नंदुरबार १३४, बीड १२७, कोल्हापूर १०८, अमरावती १०१, लातूर १००, भंडारा ८४, गोंदिया २२, गडचिरोली १२, अकोला १.आॅनलाइन अर्जया योजनेसाठी जिल्हाभरातून २६०६ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केले होते. सर्वाधिक अर्ज निफाड तालुक्यातून तर सर्वात कमी अर्ज पेठ तालुक्यातून प्राप्त झाले होते. या योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या कृषी विभागाला ६ कोटी १० लाख ३९ हजारांचा निधी प्राप्त झाला. अनुदानाची सर्व रक्कम शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकagricultureशेतीMONEYपैसा