शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

डाळ व्यापाऱ्यांची झडती सुरूच

By admin | Updated: October 21, 2015 23:25 IST

७० ठिकाणी तपासणी : प्रशासनाचे हात रिकामे

नाशिक : तूरडाळ साठवणुकीच्या संशयावरून जिल्ह्यातील ७० व्यापाऱ्यांच्या दुकानांची व गुदामांची दुसऱ्या दिवशीही तपासणी करण्यात आली. परंतु शासनाने घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना अन्नधान्य, डाळींच्या साठवणुकीच्या क्षमतेच्या दिलेल्या वाढीव परवान्यांमुळे प्रशासनाच्या हाती काहीही लागलेले नाही. खुल्या बाजारात तूरडाळीचे भाव दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत भिडल्याने व्यापाऱ्यांनीच डाळींची साठवणूक करून कृत्रिम टंचाई केल्याचा शासनाला संशय असल्यामुळे मंगळवारपासून धान्य व्यापाऱ्यांची दुकाने व गुदामे तपासून क्षमतेपेक्षा जास्त डाळ साठवणूक करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील धान्य व डाळी विक्रेत्यांचे परवाने व गुदामातील शिल्लक मालाची तपासणी केली जात असून, ज्या ज्या ठिकाणी डाळ मिल आहे, त्यांचीही क्षमता तपासून वाढीव साठा आहे किंवा काय याची खात्री करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील काही डाळ मिलचालकांची चौकशी केली असता, त्यांना शासनाने परवाना दिलेल्या प्रमाणापेक्षा अत्यल्प डाळ शिल्लक असल्याची आढळून आली आहे. जिल्ह्यात राजस्थान, मराठवाड्याकडून डाळींची आयात होते हे या तपासणीत स्पष्ट झाले; परंतु यंदा डाळींचे उत्पादन घटल्यामुळे पाहिजे तितकी डाळ घेता आली नाही, अशी खंत व्यापाऱ्यांनी बोलून दाखविली. शहरातील काही विक्रेत्यांचे पेठरोडवरील कृउबा आवारात गुदामे असल्यामुळे या ठिकाणी डाळींचा साठा असण्याची शक्यता लक्षात घेता धान्य वितरण अधिकारी सुनील सैंदाणे, नायब तहसीलदार बिरारी यांनी कृउबातील चार व्यापाऱ्यांच्या गुदामांची तपासणी केली, त्याचबरोबर नाशिकरोड येथेही काही व्यापारी असल्याचे कळाल्यावर त्यांचाही शिल्लक साठा तपासला; परंतु त्यात काहीच आढळून आले नाही. (प्रतिनिधी)