प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार ४ सप्टेंबरला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:15 IST2021-09-03T04:15:59+5:302021-09-03T04:15:59+5:30

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड दिला जाणारा २०२१चा जनस्थान पुरस्कार प्रख्यात साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना ...

Prestige Janasthan Award on September 4! | प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार ४ सप्टेंबरला !

प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार ४ सप्टेंबरला !

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड दिला जाणारा २०२१चा जनस्थान पुरस्कार प्रख्यात साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना शनिवारी (दि. ४) प्रदान करण्यात येणार आहे.

हा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार म्हणजे साहित्य क्षेत्रात असामान्य कामगिरी करून भारतीय समाजाचे साहित्य जीवन समृद्ध करणाऱ्या महनीय व्यक्तिंना हा कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञतेचा नमस्कार केला जातो. यंदा हा पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी आयोजित केलेला जनस्थान पुरस्कार समारंभ स्थगित केला होता. आता हा पुरस्कार शनिवारी सायंकाळी ५ वाजता कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार व कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम केवळ ४० ते ५० निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे. अन्य रसिकांसाठी हा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान या फेसबुक पेजवरून ऑनलाईनही उपलब्ध राहणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले आहे.

फोटो

२मधु मंगेश कर्णिक

Web Title: Prestige Janasthan Award on September 4!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.