शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष म्हणतात, बिघडले काय?

By admin | Updated: October 11, 2015 21:38 IST

कुसुमाग्रज प्रतिष्ठान : घटनेतील दहा वर्षे मुदतीचे कलम वगळण्यासाठी आटापिटा

नाशिक : गेल्या पंचवीस वर्षांत कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये एका पैशाचा गैरव्यवहार झालेला नाही. मग प्रतिष्ठानचे विश्वस्त वर्षानुवर्षे पदावर राहिले तर बिघडले कोठे, असा सवाल प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला. अध्यक्षांच्या याच पवित्र्यामुळे ठराविक विश्वस्तांना प्रतिष्ठानमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, प्रतिष्ठानच्या घटनादुरुस्तीचा प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष व विश्वस्तांनी सध्या प्रतिष्ठानच्या घटनेत दुरुस्ती करण्याचा घाट घातला असून, या पार्श्वभूमीवर कर्णिक यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी या प्रक्रियेचे समर्थनच केले. प्रतिष्ठानची घटना स्वत: कुसुमाग्रजांनी तयार करवून घेतली असून, या घटनेच्या आठव्या कलमात प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदाचा कार्यकाळ पाच वर्षे असा निश्चित करण्यात आला आहे. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुन्हा पाच वर्षांसाठी मुदतवाढ देता येते; मात्र एका व्यक्तीने दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर तिला विश्वस्तपदावर राहता येत नाही. प्रतिष्ठानवर ठराविक व्यक्तींनी वर्षानुवर्षे ठाण मांडून राहू नये, नव्या व्यक्तींनाही कामाची संधी मिळावी, असा दूरगामी विचार करून तात्यासाहेबांनी घटनेत या कलमाचा अंतर्भाव केला होता; मात्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विश्वस्तांनी या कलमात दुरुस्तीचा निर्णय घेत कुसुमाग्रजांच्या मूळ हेतूलाच नख लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या कलमातील दहा वर्षे मुदतीची अट वगळण्याचा ठराव विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला असून, त्यानुसार धर्मादाय आयुक्तांकडे दुरुस्तीचा प्रस्तावही पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. प्रतिष्ठानच्या घटनेत ‘कोणत्याही विश्वस्ताची मुदत एकूण दहा वर्षांपेक्षा अधिक असणार नाही’, असा स्पष्ट उल्लेख कुसुमाग्रजांनी केला आहे. त्यामागे त्यांचा ठोस विचार होता; मात्र या प्रक्रियेद्वारे त्या विचारालाच तिलांजली देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दुरुस्तीमुळे ठराविक व्यक्तींना वर्षानुवर्षे विश्वस्तपदावर ठाण मांडून राहता येणार असून, नव्या व्यक्तींचा प्रतिष्ठानमधील प्रवेश दुर्लभ होण्याची भीती सांस्कृतिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)ही काही सोसायटी नाही...या घटनादुरुस्तीतून कुसुमाग्रजांच्या मूळ हेतू वा विचारांना धक्का लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. वेळोवेळी गरजेनुसार घटनेत दुरुस्ती व्हावी, अशीच त्यांची भूमिका होती. हे कुसुमाग्रज प्रतिष्ठान आहे, एखादी सोसायटी नाही, की जिचे संचालक दर तीन वर्षांनी बदलावेत. प्रतिष्ठानची निर्णयप्रक्रिया दीर्घकालीन असते. तिच्यात सातत्य राहावे, यासाठी ही दुरुस्ती केली जात आहे. यासंदर्भातील ठराव विश्वस्तांच्या बैठकीत मंजूर झालेला आहे. यात बेकायदेशीर काहीही नाही. सगळे विश्वस्त खाऊन-पिऊन सुखी आहेत. प्रतिष्ठानमध्ये गेल्या २५ वर्षांत एका पैशाचा गैरव्यवहार झालेला नाही. मग हे विश्वस्त वर्षानुवर्षे पदावर राहिले तर बिघडले काय?- मधु मंगेश कर्णिक, अध्यक्ष, प्रतिष्ठान