शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला

By admin | Updated: September 9, 2015 21:54 IST

समाधान : पिंपळगाव, लासलगावसह निफाड तालुक्यात मुसळधार

लासलगाव : बऱ्याच कालावधीनंतर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता लासलगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. शेतकरीवर्गाने वेळेवर महागडी बियाणे आणून ही बियाणे मोठ्या आशेने पेरली. दररोज आकाशाकडे नजरा लावून शेतकरी पावसाच्या सरींची चातकासारखी वाट बघत आहे. परंतु पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जागोजागी पाणी साचलेले दिसून आले. या वर्षी प्रथमच रस्त्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले.पावसामुळे बुधवारी पहाटे लासलगाव - कोटमगाव रस्त्यावर मोठा वृक्ष एका दुकानासमोर कोसळला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून लासलगाव येथील कांदा उत्पादक शेतातील कांदा रोपांना टॅँकर विकतचे पाणी आणून रोपे वाचवत होते. त्यांना थोडाफार सुटकेचा नि:श्वास सोडला. शेतातील सोयाबीन, मका, कांदा यांना दिलासा मिळाला आहे, तर यावेळी खरीप पीक धोक्यात आले. पाऊस नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिके येणार की नाही याची काळजी निर्माण झाली असताना आॅक्टोबर महिन्याच्या द्राक्षबागा छाटणीचे शेड्युल ठरविता येत नव्हते. पाण्याची समस्या निर्माण झाली तर पीक कसे जगवावे या विवंचनेत शेतकरी होते. परंतु मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने काही प्रमाणात द्राक्ष उत्पादकांनी आॅक्टोबर छाटणीचे नियोजन करीत आहेत. पूर्वाच्या पावसामुळे रब्बीच्या आशा खामखेडा : सुरवातीच्या कमी पावसामुळे खरिपांची पिके हातातून गेली; परंतु या पावसामुळे रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चालूवर्षी सुरुवातीची तिन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने मध्यंतरी झालेल्या अल्पश: पावसावर शेतकऱ्याने शेतात खरीप पिकांची पेरणी केली. खरिपाची पिके उगवली; परंतु खरीप पिकांची पेरणी झाल्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिल्याने पिके पाण्याअभावी करपू लागली. पाऊस न झाल्यामुळे पिकांची वाढ झाली नाही आणि दाणा भरण्याच्या आत पिके कोमेजून गेल्याने खरिपाची पिके हाती आली नाही. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता.गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यासह पूर्वाच्या पावसाने हजेरी लावल्याने तूर्त लावणीला आलेली कांद्याचे रोपे, लागवड केलेला कांदा आदिंना जीवदान मिळाले आहे. या पावसाने रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.पूर्वाच्या नंतर हस्ती,उत्तरा , चित्र ,हे महत्वाची पावसाचे नक्षत्र अजुन बाकी आहेत.या नक्षत्राचा पाऊस जोरदार असतो. जर या नक्षत्रामध्ये जर जोरदार पाऊस झाला ,तर नदी ,शिवारातील बांध,नाल्ये पाण्याने तुडुब भरून भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरिच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन विहिरिणा पानी उतरते त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात गव्हू,हरभरा रागडा कांदा व त्याच बरोबर महत्वाचा आशे उन्हाळी कांदा चे पिक घेता येईल.या पूर्वाच्या पावसाने शेतकर्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.