शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
3
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
4
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
5
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
6
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
7
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
8
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
9
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
10
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
11
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
12
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
13
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
14
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
15
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
16
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
17
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
18
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
19
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 

येवल्यातील ५३ शाळांचा वीजपुरवठा खंडित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 10:55 PM

येवला : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७२ शाळांपैकी १९ शाळांमध्ये अद्याप वीजजोडणीच नसून ५३ शाळांची वीजबिले थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून वीज नसताना या शाळांमध्ये तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पुरवलेले लेड टीव्ही, डिजिटल बोर्ड, संगणक आदी साहित्य पडून आहे.

ठळक मुद्देबिल थकले : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १९ शाळांमध्ये जोडणीच नाही

येवला : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७२ शाळांपैकी १९ शाळांमध्ये अद्याप वीजजोडणीच नसून ५३ शाळांची वीजबिले थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून वीज नसताना या शाळांमध्ये तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पुरवलेले लेड टीव्ही, डिजिटल बोर्ड, संगणक आदी साहित्य पडून आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंगणगाव केंद्रातील तळ्याचा माथा (धुळगाव), भारम केंद्रातील आडसुरेगाव, आढाव- कुºहेवस्ती, बोकटे केंद्रातील बोंबलेवस्ती, गणेशवाडी, गवंडगाव केंद्रातील महादेववाडी, कुसमाडी केंद्रातील सावखेडे, भगतवाडी, म्हसोबावाडी (कुसमाडी), म्हसोबावाडी (कुसुर), पाटोदा केंद्रातील डोहवस्ती, राजापूर केंद्रातील नाईकवस्ती, मल्हावाडी, दाणेवस्ती, वाघवस्ती, सावरगाव केंद्रातील गोपाळवाडी, म्हस्के वस्ती, गायरान वस्ती, मोठामळा या १९ शाळांना अद्यापपावेतो वीजजोडणीच नाही, तर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंदरसूल केंद्रातील फुलेवाडी, मन्याडथडी, दुर्गाभवानी वाडी, बजरंगवाडी, देवानंदवाडी, रामवाडी, शंकरवाडी, दळेवस्ती, भारम केंद्रातील तळवाडे, शिवाजीनगर (तळवाडे), रहाडी, महादेववाडी, विठ्ठलवाडी, कौटखेडे, डोंगरगाव, बोकटे केंद्रातील दुगलगाव, देवळाणे, चिचोंडी केंद्रातील हनुमानवाडी, महालखेडा, पाटोदा, निमगाव मढ, गवंडगाव केंद्रातील सुरेगाव रस्ता, भायखेडे, गारखेडे, पाणलोटवस्ती, कुसमाडी केंद्रातील अनकाई बारी, धामोडे, कुसमाडी, नगरसूल केंद्रातील हडपसावरगाव, लहित, बटवलवस्ती, गाडेवस्ती, कोळगाव, नागडे केंद्रातील कोटमगाव बुद्रूक व खुर्द, वडगाव, राजापूर केंद्रातील सोमठाणजोश, खिर्डीसाठे, जायदरे, लमाणतांडा, हनुमाननगर, सावरगाव केंद्रातील आंबेवाडी, कासारखेडा, गोरेवस्ती, गोपाळवस्ती, सोमठाणदेश केंद्रातील लौकी, शिरसगाव, मुरमी, निळखेडे, महादेव मंदिर, विखरणी, गायके- बागुल वस्ती, जगतापवस्ती, यवला मराठी केंद्रातील रेल्वे स्टेशन (येवला) या ५३ शाळांचे एकूण एक लाख ५८ हजार ११४ रुपये वीजबि ल थकल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.शाळांसाठी व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जात असल्याने शाळा वीजबिल भरू शकली नसल्याचे कारण सांगितले जाते. तर या प्रश्नी वीज उपलब्ध करून देण्याची मागणी पालकांकडून केली जात असताना पर्यायी व्यवस्थेचा विचार करण्याची सूचना खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संबंधिताना केली होती. मात्र, अद्यापही या शाळांमध्ये वीजपुरवठा सुरू झालेला नाही. सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्या तरी गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न आहे.

येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये चौदाव्या किंवा पंधराव्या वित्त आयोग निधीतून सौर यंत्रणा बसविल्यास शाळांमध्ये वीज उपलब्ध होवून अध्यापनाचे काम सुरूळीत होईलच याबरोबरच वीज देयकांचा प्रश्नही राहणार नाही. जिल्हा परिषद मुख्य कायर्कारी अधिकारी यांना आपण या संदर्भात पत्र पाठवून याबाबत ग्रामपंचायतींना आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे.- प्रविण गायकवाड, सभापती, पंचायत समिती, येवला

टॅग्स :mahavitaranमहावितरणSchoolशाळा