शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

स्थगिती अतिक्रमणांना, प्रशासन म्हणते फलकांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:34 IST

नाशिक : शहरात बेकायदा राजकीय फलक दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेचा विविध कर वसुली आणि अतिक्रमण विभाग मात्र मौन बाळगून ...

नाशिक : शहरात बेकायदा राजकीय फलक दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेचा विविध कर वसुली आणि अतिक्रमण विभाग मात्र मौन बाळगून आहे. उच्च न्यायालयाने कोरोनाच्या संकटामुळे शहरातील अतिक्रमणे हटवू नये, अशी सूचना केली असताना प्रत्यक्षात मात्र फलक म्हणजे अतिक्रमण त्यामुळे ते हटवता येत नाही अशी अजब भूमिका विविध कर वसूल विभागाच्या वरिष्ठांनी घेतली आहे.

शहरात दिवाळीनंतर राजकीय पक्षांचे फलक पुन्हा झळकू लागले आहेत. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे राजकीय नेत्यांचे शुभेच्छा फलक तसेच अभिनंदनापासून दशक्रिया विधीपर्यंतचे अनेक फलक शहरभर लागले आहेत. राजकीय नेते, मंत्री यांचे दौरे सुरू झाल्याने त्यांच्या स्वागतासाठीदेखील वाहतूक बेटात आणि रस्त्याच्या कडेला फलक लागल्याने अपघातदेखील होत आहेत. अशाप्रकारच्या फलकबाजीतून नाशिक शहरात खून-मारामाऱ्या आणि सामाजिक तणावाचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने वेळोवेळी फलक हटवण्याचे आदेश दिले आहेत. तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेण्याचेदेखील आदेश आहेत. परंतु प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाही, अशी तक्रार आहे.

महापालिकेच्या संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांनी तर सध्या कोराेनामुळे अतिक्रमण हटू नये असे आदेश आहेत, असे कारण पुढे केले आहे. मुळात काेरोनाकाळात विस्थापित नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून उच्च न्यायालयाची सहानुभूती आहे. परंतु अतिक्रमण या सदरात फलकबाजांचा समावेश करूनदेखील त्यांच्यावर कारवाई न करण्याचा अजब फंडा प्रशासनाने शोधला आहे.

इन्फो..

निवडणुका जवळ आल्या की फलकांचे पेव फुटते, हे खरे असले तरी परवानगी न घेता फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तसेच त्यांच्याकडे मनपाचे शुल्क प्रलंबित दाखवून नेते आणि उमेदवार तसेच नगरसेवकांनादेखील प्रशासन अडचणीत आणू शकते. परंतु कारवाईचे धारिष्ट्य नसल्याने खातेप्रमुख अशाप्रकारचे कायद्याचे पालन करण्यास कचरत असल्याची चर्चा आहे.