शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

स्थगिती अतिक्रमणांना, प्रशासन म्हणते फलकांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 00:33 IST

 शहरात बेकायदा राजकीय फलक दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेचा विविध कर वसुली आणि अतिक्रमण विभाग मात्र मौन बाळगून आहे. उच्च न्यायालयाने कोरोनाच्या संकटामुळे शहरातील अतिक्रमणे हटवू नये, अशी सूचना केली असताना प्रत्यक्षात मात्र फलक म्हणजे अतिक्रमण त्यामुळे ते हटवता येत नाही अशी अजब भूमिका विविध कर वसूल विभागाच्या वरिष्ठांनी घेतली आहे.

ठळक मुद्देअजब कारभार : शहरातील फलकबाजी ‘जैसे थे’

नाशिक :  शहरात बेकायदा राजकीय फलक दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेचा विविध कर वसुली आणि अतिक्रमण विभाग मात्र मौन बाळगून आहे. उच्च न्यायालयाने कोरोनाच्या संकटामुळे शहरातील अतिक्रमणे हटवू नये, अशी सूचना केली असताना प्रत्यक्षात मात्र फलक म्हणजे अतिक्रमण त्यामुळे ते हटवता येत नाही अशी अजब भूमिका विविध कर वसूल विभागाच्या वरिष्ठांनी घेतली आहे.शहरात दिवाळीनंतर राजकीय पक्षांचे फलक पुन्हा झळकू लागले आहेत. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे राजकीय नेत्यांचे शुभेच्छा फलक तसेच अभिनंदनापासून दशक्रिया विधीपर्यंतचे अनेक फलक शहरभर लागले आहेत. राजकीय नेते, मंत्री यांचे दौरे सुरू झाल्याने त्यांच्या स्वागतासाठीदेखील वाहतूक बेटात आणि रस्त्याच्या कडेला फलक लागल्याने अपघातदेखील होत आहेत. अशाप्रकारच्या फलकबाजीतून नाशिक शहरात खून-मारामाऱ्या आणि सामाजिक तणावाचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने वेळोवेळी फलक हटवण्याचे आदेश दिले आहेत. तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेण्याचेदेखील आदेश आहेत. परंतु प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाही, अशी तक्रार आहे.महापालिकेच्या संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांनी तर सध्या कोराेनामुळे अतिक्रमण हटू नये असे आदेश आहेत, असे कारण पुढे केले आहे. मुळात काेरोनाकाळात विस्थापित नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून उच्च न्यायालयाची सहानुभूती आहे. परंतु अतिक्रमण या सदरात फलकबाजांचा समावेश करूनदेखील त्यांच्यावर कारवाई न करण्याचा अजब फंडा प्रशासनाने शोधला आहे.कारवाईचे धारिष्ट्य नाहीनिवडणुका जवळ आल्या की फलकांचे पेव फुटते, हे खरे असले तरी परवानगी न घेता फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तसेच त्यांच्याकडे मनपाचे शुल्क प्रलंबित दाखवून नेते आणि उमेदवार तसेच नगरसेवकांनादेखील प्रशासन अडचणीत आणू शकते. परंतु कारवाईचे धारिष्ट्य नसल्याने खातेप्रमुख अशाप्रकारचे कायद्याचे पालन करण्यास कचरत असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार