शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

३२ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

By admin | Updated: June 24, 2014 00:28 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज शांततेत मतदान झाले.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज शांततेत मतदान झाले. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याने मतदानाचा वेग सकाळपासूनच वाढला होता. दुपारी शुकशुकाट जाणवणाऱ्या मतदान केंद्रावर सायंकाळच्या वेळी मतदानाच्या आकडेवारीत वाढ होत असताना दिसून आली. दरम्यान, तालुक्यातील घोटी खुर्द या गावात सकाळीच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या महिन्यात मुदत संपणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान घेण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. माघारीच्या दिवशी पिंपळगाव घाडगा, वाळविहीर, आवळखेड भावली खुर्द आणि चिंचलेखैरे या पाच गावांची निवडणूक बिनविरोध झाली असल्याने उर्वरित ३२ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या आज झालेल्या महत्त्वपूर्ण तिसऱ्या टप्प्यात तालुक्यातील घोटी, गोंदे, वाडीवऱ्हे, टाकेद या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष आज होणाऱ्या मतदानाकडे लागले होते. आज झालेल्या मतदानात तालुक्यातील घोटीसह खंबाळे, माणिकखांब, सांजेगाव, वाडीवऱ्हे, गोंदे दुमाला, मुकणे, साकूर, पिंपळगाव डुकरा, नांदगाव बु।।, घोटी खुर्द, भरवीर खुर्द, जानोरी, शेणीत, काळुस्ते, वाघेरे, बोरली, मानवेढे, पिंप्री सद्रोद्दिन, टिटोली, भावली बु।।, कुरुंगवाडी, तळोशी, आंबेवाडी, टाकेद बु., अडसरे बु., धामणगाव, बेलगाव तऱ्हाळे, निनावी, टाकेद खुर्द, खेड भैरव, त्रिंगलवाडी व कुऱ्हेगाव आदि प्रतिष्ठित गावांच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी तहसील विभागाने खबरदारी घेत मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तहसीलदार महेंद्र पवार यांच्यासह नायब तहसीलदार जितेंद्र केदारे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे मतदान केंद्रांवर लक्ष ठेवून होते.