शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महाड शहरात मतदानजागृती अभियान

By admin | Updated: September 23, 2014 00:40 IST

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 15 ऑक्टोबर रोजी होणार असल्याने मतदारांनी या निवडणुकांत अधिकाधिक मतदान करावे, यासाठी महाड उपविभागातर्फे शहरांतून मतदान जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले

महाड : विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 15 ऑक्टोबर रोजी होणार असल्याने मतदारांनी या निवडणुकांत अधिकाधिक मतदान करावे, यासाठी महाड  उपविभागातर्फे शहरांतून मतदान जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. या निमित्त काढलेल्या जागृती अभियान रॅलीला महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली.
विधानसभा निवडणुकांते अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे या करिता मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणो मतदान जागृती मोहिम महाड मतदार संघामध्ये राबविण्यात येत आहे. स्वीपचा प्रचार अधिकाधिक होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी सातपुते यांनी सांगितले. चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार वाहून रॅलीचा शुभारंभ प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला. शहरांतील सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी, नागरिक सहभागी झाले होते. चवदार तळे येथून निघालेली रॅली बाजारपेठेसह अंतर्गत वसाहतीतून फिरली. यामध्ये स्वीप प्रचारावर अधिक लक्ष देण्यात आले. हॉटेल्स व्यावसायिक, पेट्रोल पंप चालक, दुकानदारांनी आपल्या व्यवसायासमोर मतदान प्रचाराचे फलक लावण्याचे आवाहन करण्यात आले. मतदारांनी आपली नावे मतदान यादींमध्ये तपासून घ्यावीत, मतदानाच्या दिवशी आपल्याप्रमाणो इतरांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करावे, यामुळे मतदान अधिकाधिक होण्याकरिता सहकार्य मिळणार आहे. शहरी भागाप्रमाणो ग्रामिण भागातही मतदान जागृती मोहिम सुरु करण्यात आली असून घराघरामध्ये जाऊन कर्मचारी मतदानाची माहिती देत असल्याचे सातपुते यांनी सांगितले. 
 
वडखळ - पेण विधानसभा मतदार संघात होणा:या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणो आवश्यक आहे. या करीता मतदार संघातील बँक अधिका:यांसमवेत पेण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले. 
स्वीप दोन कार्यक्र मानुसार पेण मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी  करण्यात आले 
आहे.