नाशकातील दोन बहिणींच्या पॉकेटमनीतून पोलीसांना सुरक्षा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:14 IST2020-06-09T14:11:01+5:302020-06-09T14:14:38+5:30
कोरोना विरोधातील लढ्यात पोलीस महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षितताही गरजेची आहे. हीच गोष्ट ओळखून नाशिकच्या आदिया आणि आर्या राज लोनसाने या दोघा बहिणीनी आपल्या पॉकेटमनीतून पोलिसाना फेस मास्क, फेस शिल्ड आणि सॅनेटायझर यासारख्या साहित्याची मदत करून सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले आहे.

नाशकातील दोन बहिणींच्या पॉकेटमनीतून पोलीसांना सुरक्षा कवच
नाशिक : कोरोना विषाणू विरूद्धच्या लढ्यात पोलीस महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षितताही गरजेची आहे. हीच गोष्ट ओळखून नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल अॅकेडमीत शिकणाऱ्या आदिया आणि आर्या राज लोनसाने या दोघा बहिणीनी आपल्या पॉकेटमनीतून पोलिसाना फेस मास्क, फेस शिल्ड आणि सॅनेटायझर यासारख्या साहित्याची मदत करून सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले आहे.
कोरोना विषाणू विरूद्धच्या लढाईत सामान्य नागरिकांचा कोरोनापासून बचाव करतांना पोलिसांना मात्र कोरोनाची लागण होत असून काहींचा मृत्यूही झाला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आदिया आणि आर्या या दोन बहीणींनी त्यांचा संपूर्ण पॉकेटमनी पोलिसांसाठी खर्च करण्याचे ठरविले. यातून त्यांनी कोरोनापासून बचावासाठी आवश्यक एक हजार एन ९५ मास्क, शंभर फेस शिल्ड आणि ५५ फेस शिल्ड असे एकूण एक लाख पंचवीस हजारांहून अधिक किंमतीचे साहित्य नाशिक पोलीसांना उपलब्ध करून देत शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड आदी भागात या साहित्याचे वाटप केले. दरम्यान, आदिता आणि आर्या या दोन्ही बहिनींना मिळणाऱ्या पॉकेटमनीतून बचत करून त्यांना हवी असलेली वस्तू खरेदी करण्याची सवयी आहे. परंतु, सध्या आता कोरोनामुळे सगळेच बदलले असून रोजच पोलीसांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आपली काळजी घेणाऱ्या पोलीसांची मदत करण्याचा विचार सुचला आणि त्यातून पोलीस काकांसाठी मास्क, फेस शिल्ड आणि सॅनिटाजरचे गिफ्ट केल्याची प्रतिक्रिया अदिता आणि आर्या यांनी व्यक्त केली आहे.