शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिअभिलेखच्या तिघा संशयिताना पोलीस कोठडी

By admin | Updated: November 12, 2016 22:22 IST

भूमिअभिलेखच्या तिघा संशयिताना पोलीस कोठडी

 सिन्नर : मोजणी नकाशा देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून बारा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या भूमिअभिलेख खात्याच्या उपअधीक्षकांसह तिघांना शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघाही संशयिताना चार दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत(दि. १५) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सिन्नर येथील एका शेतकऱ्याने शिवारातील गट क्रमांक ७३५ (९९०) मधील त्याच्या पोटहिश्शाची १ हेक्टर ९३ आर जमीन विक्रीसाठी काढली होती. सदर जमिनीची मोजणी करण्यासाठी तक्रारदाराने तालुका भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. भूमिअभिलेख कार्यालयाकडून सदर जमिनीची मोजणी पूर्ण झाली होती. मोजणी नकाशाची प्रत देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील संशयित शिरस्तेदार सुरेश चंद्रकिशोर रगडे व लिपिक भगीरथ जिभाऊ चव्हाण यांनी तक्रारदाराकडून १२ हजार रुपये घेतले होते. त्यास उपअधीक्षक पांडुरंग नरहरी सानप यांनी समंती दिली. याप्रकरणी गुरुवारी दुपारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून या तिघा संशयिताना रंगेहात पकडले होते. रात्री उशिरा सिन्नर पोलीस ठाण्यात या तिघा संशयितांविरोधात लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या तिघा संशयिताना मंगळवारपर्यंत (दि. १५) पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. कल्पक निंबाळकर यांनी काम पाहिले. (वार्ताहर)