शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील दोन मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:21 IST

जेलरोड परिसरातील इंगळेनगर व भारतनगर झोपडपट्टीतील दोन मटका अड्ड्यांवर शनिवारी (दि़१२) पोलिसांनी छापे टाकले़ या छाप्यांमध्ये नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे़

नाशिक : जेलरोड परिसरातील इंगळेनगर व भारतनगर झोपडपट्टीतील दोन मटका अड्ड्यांवर शनिवारी (दि़१२) पोलिसांनी छापे टाकले़ या छाप्यांमध्ये नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे़इंगळेनगर पाण्याच्या टाकीजवळ कल्याण बाजार मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ या माहितीनुसार नाशिकरोड पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता संशयित दिलीप देवीदास राठोड (शिवगंगा सोसायटी, जेलरोड) व संजय पांडुरंग चव्हाण (श्रमिकनगर, जेलरोड) हे दोघे मटका जुगार खेळत होते़ पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ९३० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले असून, त्यांच्यावर जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़  मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील वडाळा-पाथर्डी रोडवरील भारतनगरमध्ये सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर शनिवारी (दि़१२) सकाळी छापा टाकला़ यावेळी संशयित हारुण मोहम्मद शेख व त्याचे सहा साथीदार कल्याण मुंबई नावाचा मटका जुगार खेळत होते़ पोलिसांनी या सातही संशयितांना ताब्यात घेऊन रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय