भद्रकालीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 17:42 IST2018-10-16T17:42:06+5:302018-10-16T17:42:09+5:30
नाशिक : भद्रकालीतील हुसैनी चौकातील एका इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़१५) छापा टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़

भद्रकालीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
ठळक मुद्दे रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त
नाशिक : भद्रकालीतील हुसैनी चौकातील एका इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़१५) छापा टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़
हुसैनी चौकातील पॅराडाईज बिल्डिंगच्या मोकळ्या जागेत जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता संशयित असफ कोकणी, जरीन खान, सुलतानगौर सय्यद, अकीब शेख, एजाज सय्यद व समीर खान हे पत्त्यावर जुगार खेळत होते़ पोलिसांनी या सहा संशयितांना ताब्यात घेतले असून त्याच्यावर जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़