शिवाजीनगरच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 16:52 IST2018-09-19T16:51:16+5:302018-09-19T16:52:00+5:30

नाशिक : गंगापूररोड शिवाजीनगर येथील मोकळ्या जागेवरील जुगार अड्ड्यावर मंगळवारी (दि़१८) मध्यरात्री गंगापूर पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या सहा जुगा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़

 Police raid on Shivaji Nagar's gambling street | शिवाजीनगरच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

शिवाजीनगरच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

ठळक मुद्दे रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त

नाशिक : गंगापूररोड शिवाजीनगर येथील मोकळ्या जागेवरील जुगार अड्ड्यावर मंगळवारी (दि़१८) मध्यरात्री गंगापूर पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या सहा जुगा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़

गंगापूररोड मोतीवाला कॉलेजच्या समोरील बिल्डिंगच्या मोकळ्या जागेत जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार या ठिकाणी छापा टाकला असता संशयित हारुन इस्माईल पिंजारी ( रा. मॉडर्न सिम्फनी, शिवाजीनगर), निखिल गवळी (रा. हरसूल सोसायटी, अशोकनगर), ऋषीकेश बाळासाहेब सूर्यवंशी (रा. कोळीवाडा, गंगापूर), तुषार प्रकाश पंडित (रा. साई सोसायटी, शिवाजीनगर, सातपूर), नीलेश एकनाथ आहेर (रा. सुवर्ण संगम सोसायटी, सातपूर) व किरण दशरथ जाधव (रा. नयन हाऊस,अशोकनगर) हे पत्त्यांवर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़

पोलिसांनी या संशयितांकडून एक हजार ७०० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़

Web Title:  Police raid on Shivaji Nagar's gambling street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.