इगतपुरी येथे रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, उच्चभ्रू घरातील नऊ तरुणांसह काही तरुणी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 13:42 IST2017-10-04T11:14:56+5:302017-10-04T13:42:44+5:30

मुंबई - आग्रा महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी शिवारात असणा-या रेन फॉरेस्ट नामक पंचतारांकित हॉटेलात पोलिसांना छापा टाकून ही कारवाई केली

Police raid on Rev Party at Igatpuri, nine young men and women among elite women in police custody | इगतपुरी येथे रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, उच्चभ्रू घरातील नऊ तरुणांसह काही तरुणी पोलिसांच्या ताब्यात

इगतपुरी येथे रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, उच्चभ्रू घरातील नऊ तरुणांसह काही तरुणी पोलिसांच्या ताब्यात

घोटी (नाशिक) - रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून काही तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतलं आहे. मुंबई - आग्रा महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी शिवारात असणा-या रेन फॉरेस्ट नामक पंचतारांकित हॉटेलात पोलिसांना छापा टाकून ही कारवाई केली. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. इगतपुरी पोलिसांनी नऊ तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर इगतपुरी पोलिसांनी छापा टाकला होता. छापा टाकला असता हॉटेलात उच्चभ्रू घरातील काही तरुण आणि तरुणी मद्याच्या नशेत अर्धनग्न अवस्थेत रेव्ह पार्टी करीत असल्याचे आढळून आले.

दरम्यान हे तरुण आणि तरुणींची माहिती पोलीस मिळवत असून कोठून आले आहेत याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत. निर्जनस्थळी असलेल्या या हॉटेलात गेल्या काही वर्षांपासून रेव्ह पार्टीचे प्रकार सुरू होते. रात्रभर चालणाऱ्या या धांगडधिंग्याला ग्रामस्थही त्रस्त झाले होते. पोलिसांनी याबाबत कारवाई करावी अशी मागणीही यापूर्वी अनेकदा करण्यात आली होती. मात्र दखल घेतली गेली नाही. अखेर मंगळवारी या रेव्ह पार्टीची कल्पना पोलिसांना दिल्यानंतर कारवाई करण्यात आली.
 

Web Title: Police raid on Rev Party at Igatpuri, nine young men and women among elite women in police custody