पिंपळगाव बसस्थानकात पोलीस गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 00:15 IST2019-12-05T00:14:02+5:302019-12-05T00:15:52+5:30
पिंपळगाव बसवंत : ‘टवाळखोरांची बसस्थानकात वाढती गुंडगिरी, हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांचे दुर्लक्ष’ अशी बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच येथील पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

पिंपळगाव बसस्थानकात पोलीस गस्त
पिंपळगाव बसस्थानकात दाखल झालेले पोलीस.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : ‘टवाळखोरांची बसस्थानकात वाढती गुंडगिरी, हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांचे दुर्लक्ष’ अशी बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच येथील पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
टवाळखोरांना धाक बसावा यासाठी स्थानकात शनिवारी पोलिसांनी गस्त सुरू केली. मोबाइलमध्ये मुलींचे फोटो काढण्याचा प्रयत्न,
हाणामारी, महिला व विद्यार्थिनींची छेड काढणे, एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, धूम स्टाइल वाहने चालविणे आदी प्रकार नित्याचेच स्थानकात पहावयास मिळत होते.
‘लोकमत’ने या प्रश्नावर वाचा फोडताच पोलिसांनी स्थानक परिसरात गस्त सुरू केली.
यामुळे महिला, विद्यार्थिनींसह प्रवाशांना दिलासा मिळाला असून, स्थानक परिसरातील गैरकृत्य करणाऱ्यांनाही आळा बसण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. पोलीस येथे कोणत्याही वेळी दिवसातून दोन वेळेला गस्त घालणार आहेत.