पेठ शहरात तहसीलदारांसह पोलीस अधिकारी रस्त्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:59 IST2021-04-06T23:44:48+5:302021-04-07T00:59:24+5:30
पेठ : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशान्वये पेठ शहरात कडक निर्बध लावण्यात आले असून तहसीलदार संदीप भोसले यांच्यासह पोलीस व नगरपंचायत आधिकारी रस्त्यावर उतरल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले.

पेठ शहरात कडक निर्बंधाबाबत कारवाई करतांना तहसीलदार संदीप भोसले, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, नगरपंचायत मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार, प्रशासनाधिकारी चंद्रकांत भोये यांचे सह पोलीस, महसूल व नगरपंचायत प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी.
पेठ : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशान्वये पेठ शहरात कडक निर्बध लावण्यात आले असून तहसीलदार संदीप भोसले यांच्यासह पोलीस व नगरपंचायत आधिकारी रस्त्यावर उतरल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले.
मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडल्याने काही काळ वर्दळ वाढत असल्याचे लक्षात आल्यावर तहसीलदार संदीप भोसले, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, नगरपंचायत मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार, प्रशासनाधिकारी चंद्रकांत भोये यांच्यासह पोलीस, महसूल व नगरपंचायत प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर आल्याने व्यावसायिकांनी पटापट शटर डाऊन करत घरचा रस्ता धरला. शहरातून विनामास्क फिरणे, नियमांचे पालन न करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येत असल्याने दिवसभर शहरात शुकशुकाट दिसून येत होता.