नाशिक : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दोन गटांतील वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्यानंतर तिथे पोहोचलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने कोणत्याही प्रकारची माहिती न घेता एका तरुणाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़२३) सायंकाळच्या सुमारास घडली़ दरम्यान, हा प्रकार अंगलट येत असल्याचे लक्षात येताच पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सरकारी वाहनातून त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व त्याच्याकडून पोलिसांबाबत तक्रार नसल्याचा जबाबही लिहून घेतल्याचे वृत्त आहे़‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ अर्थात सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा नाश या ब्रीदवाक्याप्रमाणे पोलिसांनी काम करणे अपेक्षित आहे़ मात्र पोलीस उपनिरीक्षकाची हवा गेलेल्या या पोलीस अधिकाऱ्याने व त्याच्यासमवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा व वर्दीचा गैरवापर करून या युवकास बेदम मारहाण केली़ या मारहाणीमुळे युवक बेशुद्ध झाल्याने त्यास तत्काळ पोलीस वाहनात टाकून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ विशेष म्हणजे या युवकाच्या कागदपत्रांची पूर्तताही रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनीच केली़जिल्हा रुग्णालयात दाखल करताना चक्कर येऊन पडल्याचे सांगण्यात आले असले तरी या तरुणास प्रत्यक्षात जबर मारहाण करण्यात आलेली आहे़ या युवकास रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या नातेवाइकांना कळविण्याच्या भानगडीत न पडता या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांसह तेथून काढता पाय घेतला़ रात्री उशिरा हा युवक पूर्ण शुद्धीत आल्यानंतर त्याने नातेवाइकांना तसेच पत्रकारांना माहिती दिली़ या युवकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू नये याची परिपूर्ण खबरदारी घेत अधिकाऱ्याने या युवकाकडून आपल्याबाबत तक्रार नसल्याचा जबाब लिहून घेतला आहे़ (प्रतिनिधी)
पोलीस अधिकाऱ्याची तरुणावर मर्दुमकी
By admin | Updated: January 25, 2016 23:13 IST
बेशुद्ध होईपर्यंत मारहाण : तक्रार नसल्याचा जबाब घेतला लिहून
पोलीस अधिकाऱ्याची तरुणावर मर्दुमकी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}