ग्रामीण पोलीस दलातील लाचखोर सिरसाट, अहिरे यांची पोलीस कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 05:56 PM2018-11-17T17:56:23+5:302018-11-17T17:57:02+5:30

नाशिक : पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि़१५) मित्र मंडळ चौकातील एका हॉटेलात सापळा रचून नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदारास दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राजेश सदाशिव शिरसाठ (वय ४८, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण) आणि पोलीस हवालदार संजीव खंडेराव आहेर (वय ४८) अशी त्यांची नावे असून फसवणुकीच्या गुन्ह्यात वॉरंट न बजावण्यासाठी तसेच खटल्यात मदत करण्यासाठी ही रक्कम घेण्यात आली होती़ या दोघांनाही पुणे येथील न्यायालयात हजर केले असता १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

 The police officer in charge of the racket, Sirsat, Ahire, will be sent to the police custody | ग्रामीण पोलीस दलातील लाचखोर सिरसाट, अहिरे यांची पोलीस कोठडीत रवानगी

ग्रामीण पोलीस दलातील लाचखोर सिरसाट, अहिरे यांची पोलीस कोठडीत रवानगी

Next
ठळक मुद्दे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : दोन लाख रुपयांची लाच स्वीकारली

नाशिक : पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि़१५) मित्र मंडळ चौकातील एका हॉटेलात सापळा रचून नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदारास दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राजेश सदाशिव शिरसाठ (वय ४८, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण) आणि पोलीस हवालदार संजीव खंडेराव आहेर (वय ४८) अशी त्यांची नावे असून फसवणुकीच्या गुन्ह्यात वॉरंट न बजावण्यासाठी तसेच खटल्यात मदत करण्यासाठी ही रक्कम घेण्यात आली होती़ या दोघांनाही पुणे येथील न्यायालयात हजर केले असता १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयाने प्राक्लेमेशनची (जाहीरनामा) नोटीस काढली आहे. त्याचे वॉरंट बजावण्यासाठी पोलीस निरीक्षक शिरसाट व हवालदार आहिरे हे गुरुवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यावर वारंट बजावायचे नसेल तसेच खटल्यात मदत करतो, यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी दुपारी स्वारगेटजवळील मित्र मंडळ चौकाजवळ सापळा रचण्यात आला.

तक्रारदाराकडून २ लाख रुपये घेताना पोलीस हवालदार संजीव आहेर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक शिरसाट हे दुसरीकडे थांबले होते. त्यांनी आहेर यांना पैसे घेण्यासाठी पाठविले होते. त्यांचे त्याबाबत तक्रारदाराशी झालेले संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. या संभाषणानूसार लाच घेण्यामध्ये त्यांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामुळे रात्री उशिरा दोघांना अटक करण्यात आली.

याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक प्रतिभा शेंडगे व उप अधिक्षक दत्तात्रय भापकर यांनी ही कारवाई केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उप अधिक्षक प्रतिभा शेंडगे करीत आहेत.

Web Title:  The police officer in charge of the racket, Sirsat, Ahire, will be sent to the police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.