पोलिसाच्या मुलाने केला महिला पोलिसाचा विनयभंग

By Admin | Updated: August 3, 2014 01:58 IST2014-08-03T01:49:09+5:302014-08-03T01:58:04+5:30

पोलिसाच्या मुलाने केला महिला पोलिसाचा विनयभंग

Police molestation of policemen's son | पोलिसाच्या मुलाने केला महिला पोलिसाचा विनयभंग

पोलिसाच्या मुलाने केला महिला पोलिसाचा विनयभंग

 

नाशिक : पोलीस मुख्यालयात राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने महिला पोलीसाचा विनयभंग करून अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिल्याची फिर्याद संबंधित महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़ विशेष म्हणजे हा प्रकार पोलीस मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी घडला असून, अद्याप संशयिताला अटक करण्यात आलेली नाही़
या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुलीसह जात असताना संशयित भूषण दुरगुडे (रा़ पोलीस मुख्यालय) याने पिठाची गिरणीपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानादरम्यान पाठलाग केला़ तसेच रस्त्यात अडवून विनयभंग केला व मुलीच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकून मारण्याची धमकी दिली़ दुरगुडेवर यापूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून त्याने हा प्रकार केल्याचे महिलेने फि र्यादीत नमूद करण्यात आले आहे़
या प्रकरणी संशयित भूषण दुरगुडेवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Police molestation of policemen's son