आधी वृक्षारोपण नंतर बोहल्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:59 IST2018-05-14T14:59:04+5:302018-05-14T14:59:04+5:30

आधी वृक्षारोपण नंतर बोहल्यावर !
त्र्यंबकेश्वर : सध्या पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने संपुर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारने तेरा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन महाराष्ट्र वन विभागातील त्र्यंबकेश्वर येथील वनरक्षक चि. कैलास महाले व वधु चि.सौ.कां. चैताली गावित यांनी बोहल्यावर चढण्यापुर्वी अगोदर वृक्षारोपण करत एक सामाजिक संदेश दिला. या जोडप्याने एक प्रकारे वृक्षारोपणाचा आदर्श तर घालुन दिला आहे, पण इतरांनी देखील हा आदर्श घ्यावा असा हा उपक्र म आहे. उपस्थित पाहुणे मंडळींनी देखील आपापल्या घरी किमान दहा वृक्षांचे रोपण करावे अशी शपथ दिली. जंगलाचा दिवसेंदिवस ºहास होत असतांना आपण चुपचाप कसे बसायचे ? याबाबत त्यांनी पाहुणे मंडळींचे प्रबोधन करु न त्यांनी वृक्षारोपणाची शपथ दिली.वधु चैताली गावित ही सुरगाणा येथील आहे तर वर चि. कैलास हे गणेशगाव (वाघेरा) येथील आहे.अनावश्यक खर्चाला फाटा देत वराच्या गावाला हा विवाह सोहळा पार पडला हेही विशेष म्हणावे लागेल. कारण आदिवासी समाजाच्या रितीरिवाजा प्रमाणे सहसा विवाह मुलीच्या माहेरीच सरसकट करण्याची रु ढीपरंपरा आहे. यावेळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे , वनाधिकारी निवृत्ती कुंभार, माजी गटनेते योगेश तुंगार, वनरक्षक रु पाली मोरे , दर्शना सौपुरे, राजेंद्र भोसले, खंडु दळवी, रहमान हकीम, ऋषी जाधव, ज्ञानेश्वर अलगट, सुनील पवार, अशोक कंचोर, हरळे नलावडे आदी वन कर्मचारी उपस्थित होते.
----------------------------
वृक्ष लागवडीची गरज
सर्वत्र जंगले नष्ट होत आहेत. अनेक ठिकाणी निसर्गाच्या कोपाला सामोरे जावे लागत आहे. पाणी पाऊस पडेना सर्वत्र भीषण पाणी टंचाई सुरु झाली आहे. पाण्याचे स्त्रोत नाहीसे होत आहेत. उन्हाची तीव्रता जावत आहे. नद्यांचा पुर्वीचा खळखळाट बंद पडला आहे. यासाठी वृक्ष लागवड करणे महत्वाचे आहे. लोकांना हे पटायला लागले आहे. निसर्गाचे हे पुनर्वैभव परत आणायचे असेल तर वृक्ष लागवड करणे सर्वात उत्तम उपाय आहे. यासाठी महाले व गावित कुटुबियांनी अगोदर वृक्षारोपण नंतरच विवाह सोहळ्याला महत्व दिले आहे. आणि त्यांना ही प्रेरणा दिली वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी !