शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर-सायखेडा मार्गावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 19:08 IST

निफाड आणि सिन्नर या दोन्ही तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेला सिन्नर-सायखेडा मार्ग खड्ड्यांमुळे खडतर बनला आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात गेल्या आठवड्यात याच मार्गावर नायगाव शिवारात एका प्रवासी जीपने दुचाकीस धडक अशा प्रकारचे अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहे.

सिन्नर : निफाड आणि सिन्नर या दोन्ही तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेला सिन्नर-सायखेडा मार्ग खड्ड्यांमुळे खडतर बनला आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात गेल्या आठवड्यात याच मार्गावर नायगाव शिवारात एका प्रवासी जीपने दुचाकीस धडक अशा प्रकारचे अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहे.सुमारे वर्षभरापूर्वी सिन्नर-सायखेडा रस्त्याचे काम करण्यात आले आहे; मात्र अवघ्या ११ ते १२ महिन्यांत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चाटोरी, चांदोरी, सायखेडा, नायगाव, जायगाव, देशवंडी या गावातील नागरिक या मार्गाचा सिन्नरला ये-जा करण्यासाठी नियमित वापर करतात. तसेच सायखेडा येथून प्रवासी वाहतूकही या मार्गावरून नेहमीच सुरू असते. सिन्नर औद्योगिक वसाहतीत या भागातील कामगार वर्ग रोजगारासाठी येतो. रात्रीच्या शिफ्टमध्येही बरेचसे कामगार काम करीत असल्याने या खड्ड्यांचा त्यांना अंदाज येत नाही. यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात या मार्गावर झाले आहे; मात्र तरीही बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही. विशेष म्हणजे रस्त्याचे काम दर्जेदारपणे करून घेण्याची जबाबदारीही या अधिकाऱ्यांनी पार पाडली नाही. त्यातच नादुरुस्त झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचेही त्यांना सोयरसुतक नसल्याने नायगाव खोºयातून संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गावरील खड्ड्यांची समस्या ऐरणीवर आली असून तत्काळ खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या सुरक्षा रक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे. या संदर्भात सिन्नर सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा