पिंपळगावी घरोघरी आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:26 IST2019-09-17T23:04:29+5:302019-09-18T00:26:00+5:30
पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे विविध रोगांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे.

पिंपळगाव परिसरात आरोग्य विभागातर्फे तपासणी मोहिमेत सहभागी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. योगीता पाटील, डॉ.साधना बच्छाव, आरोग्य सेविका डी.बी. बागुल आदी.
पिंपळगाव बसवंत : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे विविध रोगांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे.
परिसरातील महादेववाडी, अंबिकानगर, कोळीवाडा, अचानकनगर आदी परिसरात क्षय रोग, कुष्ठरोग व संसर्गजन्य रोगांची तसेच डेंग्यू, चिकुनगुनिया या साथीच्या रोगांची घरघर जाऊन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. योगीता पाटील, डॉ. साधना बच्छाव, जिल्हा आरोग्य सुपरवायझर डॉ. हेमंत आमले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या रोगांपासून कशी सतर्कता ठेवायची यांची माहिती परिसरात देण्यात आली. पावसाळ्यात वाढणारे आणि पावसासोबत आपल्या भेटीला येणारे महत्त्वाचे आजार असल्याने आरोग्य विभागाकडून पिंपळगाव शहर परिसरात विशेष काळजी घेण्यात आली असून, आरोग्य तपासणी केली जात आहे. रोगांची माहिती देऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
यावेळी डॉ. चेतन काळे, डॉ.एस. आर. तिडके, डॉ. वाय. आर. धनवटे, डॉ. डी.बी. जाधव, आरोग्य सेविका डॉ. डी.बी. बागुल, डॉ. एस.एस. दुधाळे, डॉ. सविता तागड आदींनी परिश्रम घेतले.