अवैध दारु विक्री प्रकरणी पिंपळगावी महिला संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:50 IST2020-07-06T18:48:46+5:302020-07-06T18:50:50+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरातील शास्त्री नगर व उंबरखेड परिसरात बहुतांश ठिकाणी छुप्या मार्गाने अवैध दारू विक्र ी होत आहे. परिसरात तळीरामांकडून केल्या जाणाऱ्या असभ्य वर्तनामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी पिंपळगाव बसवंत पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अवैध दारु विक्री प्रकरणी पिंपळगावी महिला संतप्त
ठळक मुद्देकारवाईची मागणी : पोलीस निरीक्षकांना निवेदन
पिंपळगाव बसवंत शहरातील शास्त्रीनगर उंबरखेड रोड परिसरात बहुतांश ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्र ी केली जाते. दारू पिल्यानंतर तळीरामांकडून परिसरात होणाºया असभ्य वर्तनाचा नाहक त्रास परिसरातील रहिवाशांसह स्थानिक महिलांना होत आहे. परिसरातील अवैध धंदे तातडीने बंद करण्याची मागणी महिला मंडळाकडून करण्यात आली आहे. यावेळी शरद सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष गांगुर्डे, छाया लांडंगे, संगीता सोळसे, वैशाली जाधव, मंगल खरात, चंद्रकला वाघमारे, शोभा बस्ते, आशा गायकवाड, बिजलाबाई जाधव, शोभा चारोस्कर, सोनाली शिरसाठ, चंद्रकला बस्ते आदींसह महिला उपस्थित होत्या.