शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत फिजिकल डिस्टन्सिंग फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 18:50 IST

पंचवटी : दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाजार समितीने विविध प्रकारच्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारच्या ...

ठळक मुद्देहमालांना गणवेशाची प्रतीक्षासॅनिटायझर्स कक्ष बंद

पंचवटी : दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाजार समितीने विविध प्रकारच्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारच्या सूचना मनपाने दिल्या. तरीदेखील प्रत्यक्षात बाजार समितीकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्य म्हणजे बाजार समितीत येणाऱ्या प्रत्येक शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती घटकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, अशी सूचना देऊनही नियमांची पायमल्ली केली जात आहे.बाजार समितीकडून प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेले सॅनिटायझर्स कक्ष बंद करण्यात आले आहे. बाजार समितीत गर्दी टाळण्यासाठी हमालांना वेळ ठरवून देत त्यांना गणवेश देण्यात यावे, असे सुचविले होते. परंतु अद्याप हमालांना गणवेश दिलेले नाही. येथे शेतमाल घेऊन येणाºया वाहनात केवळ दोन-तीन शेतकरी असावे असे असले तरी प्रत्यक्षात चारपेक्षा जास्त लोक वाहनात बसलेले असतात. त्यातच प्रवेशद्वारावर येणा-या प्रत्येक व्यक्तीचे तापमान मोजणे बंधनकारक करण्यात आले असले तरी त्याची अंमलबजावणी नियमितपणे होत नाही. येथे प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले खरे, मात्र अनेकजण मास्क लावत नसल्याचे दिसून येते तर शेतमालाचे व्यवहार बाजार समिती बाहेर मोकळ्या जागेत घ्यावे, यावर उपाययोजना करण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रशासनाने सुचविले होते. मात्र बाजार समितीने आम्हाला बाजार समिती प्रवेशद्वाराबाहेर कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येत नाही असे स्पष्ट करत मोकळ्या जागेत व्यवहार करण्याच्या विषयाला बगल दिली आहे. बाजार समितीत दैनंदिन शेकडो शेतकरी, व्यापारी, हमाल यांची वर्दळ असल्याने कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असले तरी खुद्द बाजार समिती उपाययोजना करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप काही संचालकांनी तसेच व्यापारी आणि बाजार समिती घटकांनी केला आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती