शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मतदारांनी गाठला लाखाचा टप्पा

By admin | Updated: October 20, 2016 02:22 IST

शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद : शेवटचे दोन दिवस

नाशिक : पाच जानेवारी रोजी अंतिम प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी शहरी भागातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता एक लाखाहून अधिक नवीन मतदारांनी नोंदणीचे अर्ज सादर केले आहेत. आयोगाने आठवडाभराची वाढवून दिलेली मुदत येत्या दोन दिवसांत संपुष्टात येणार असल्याने मतदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी मतदार पुनरीक्षण मोहीम सुरू केली असून, १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी करण्याबरोबरच नाव, पत्त्यात बदल, मतदान केंद्र, मतदार संघातील बदल, नाव कमी करणे आदि सुविधा मतदारांना उपलब्ध करून दिल्या. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या मोहिमेचा फायदा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांनी उचलून जिल्ह्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष करून नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघात या मोहिमेत हजारोच्या संख्येने नवीन मतदारांचे अर्ज भरून देण्यात आले. राजकीय पक्षांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता, राज्य आयोगाने या मोहिमेला आणखी एक आठवडा म्हणजे २१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. जिल्ह्यात १८ आॅक्टोबर अखेर एक लाख २९३० इतके नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या दोन दिवसांत या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन मतदारांच्या अर्जांची छाननी केली जाणार असून, त्यात जवळपास दहा ते पंधरा टक्के मतदारांची नावे दुबार होण्याची शक्यता निवडणूक शाखेतील सूत्रांनी व्यक्त केली. या मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क मिळणार आहे. (प्रतिनिधी)