शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सेवनिवृत्तीच्या दुसऱ्या दिवसापासून मिळणार पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 01:28 IST

सातपूर :- सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास आता पेन्शनसाठी खेटे मारण्याची गरज पडणार नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पेन्शन लागू होणार आहे.नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने पेन्शन वाटप योजनेचा शुभारंभ करुन पेन्शनधारकांना दिलासा दिला आहे.

ठळक मुद्दे ईपीएस 1995 सभासदांना भविष्य निर्वाह निधी आयुक्त एम.एम.अशरफ यांच्या हस्ते पेन्शन ऑर्डरचे वाटप

सातपूर :- सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास आता पेन्शनसाठी खेटे मारण्याची गरज पडणार नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पेन्शन लागू होणार आहे.नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने पेन्शन वाटप योजनेचा शुभारंभ करुन पेन्शनधारकांना दिलासा दिला आहे.$$ आयुष्यभर काबाड कष्ट करुन सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास वेळेवर पेन्शन सुरु व्हावी एवढीच अपेक्षा असते.पेन्शन सुरु व्हावी म्हणून पीएफ कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या.त्यात बऱ्याच वेळा आस्थापनाकडून कागदपत्रांची पूर्तता होत नसे.अशा सभासदांच्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयास योजना सुरु केली आहे.या योजनेअंतर्गत वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना सेवनिवृत्तीच्या दुसऱ्या दिवसापासून पेन्शन सुरु केली जाते.

त्यासाठी सदर कामगार सेवानिवृत्त होणार असलेल्या महिन्याच्या सुरुवातीला त्याचा क्लेम फॉर्म (10 डी) कंपनीतर्फे पी.एफ.कार्यालयात पाठविणे आवश्यक आहे.हा फॉर्म मंजूर करुन त्यास सेवनिवृत्तीच्या दुसऱ्या दिवसापासून पेन्शन ऑर्डर दिली जाते.म्हणजेच दुसऱ्या दिवसापासून पेन्शन सुरु होते.या योजनेचा शुभारंभ नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयात करण्यात आला.ऑक्टोबर महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या ईपीएस 1995 सभासदांना भविष्य निर्वाह निधी आयुक्त एम.एम.अशरफ यांच्या हस्ते पेन्शन ऑर्डरचे वाटप करण्यात आले.प्रयास योजनेअंतर्गत पेन्शन धारकांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित आस्थापनांनी वेळेत क्लेम पाठवावेत असे आवाहन पीएफ कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :MIDCएमआयडीसीGovernmentसरकार